महिलांनी स्वावलंबी बनावे : माई ढोरे

रमेश मोरे
बुधवार, 7 मार्च 2018

राही माही प्रतिष्ठान व कै.शांताराम बाईत प्रतिष्ठान यांच्या वतीने सांगवी येथील आशिर्वाद हॉटेल येथे  जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील  उल्लेखनिय कामगिरी केलेल्या महिलांना पिंपरी चिंचवड महिला शक्ती गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.त्या पुढे बोलताना म्हणाल्या,स्रिया बालपणापासुन कष्ट करतात.

जुनी सांगवी : आजच्या धावपळीच्या काळात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवत स्वावलंबी बनले पाहिजे असे जुनी सांगवी येथे महिलादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना जेष्ठ नगरसेविका माई ढोरे यांनी बोलताना व्यक्त केले.

राही माही प्रतिष्ठान व कै.शांताराम बाईत प्रतिष्ठान यांच्या वतीने सांगवी येथील आशिर्वाद हॉटेल येथे  जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील  उल्लेखनिय कामगिरी केलेल्या महिलांना पिंपरी चिंचवड महिला शक्ती गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.त्या पुढे बोलताना म्हणाल्या,स्रिया बालपणापासुन कष्ट करतात.

माहेर, सासर आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी नाती जपत असतात.महिलांनी अन्याविरूद्ध आवाज उठवला पाहिजे.यावेळी माई ढोरे त्यांचे हस्ते  सामाजिक कार्यात उल्लेखनिय काम करणा-या रमा बाराथे, शोभा नाईकनवरे, मंजिरी कौढाळे,सारिका काळभोर, शोभा थोरात, शोभा शिर्के, निर्मला लाहिये,ऐश्वर्या मडगावकर,डॉ जयश्री शेलार, अनुसया पराटे,सोनाली अडागळे,योगिनी निंबाळकर यांना शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास  जवाहर ढोरे, मदन कौठुळे, दिपक माकर, अजित,काळभोर, मनोहर ढोरे, अमोल काळे आदी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र बाईत यांनी केले.फोटो ओळ-महिला जागतिक दिनानिमित्त जुनी सांगवी येथे सामाजिक कार्यात उल्लेखनिय काम करणा-या महिलांचा नगरसेविका माई ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: Marathi news Pune news Mai Dhore statement