पुणे - मांजरी ग्रामपंचायत निवडणूकीत घुले-टिळेकर कलगीतुरा

Ghule_Tilekar
Ghule_Tilekar

मांजरी (पुणे) : येथील ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराला जोरदार धार चढली आहे. येथील दोन्हीही प्रमुख प्रतिस्पर्धी पॅनेलने ही निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची केली असल्याने दोन्हीकडूनही आजी-माजी लोकप्रतिनिधींना प्रचारात आणले आहे. गेली अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतवर वर्चस्व ठेवून असलेले राष्ट्रवादीचे नेते सुरेश घुले व नव्याने वर्चस्व प्रस्थापित करू पाहणारे आमदार योगेश टिळेकर यांच्यामध्ये त्यानिमित्ताने कलगीतुरा रंगला आहे.

घुले यांच्या नेतृत्वाखालील मांजराईदेवी ग्रामविकास पॅनेल व आमदार टिळेकर, जिल्हा दूध संघाचे गोपाळ म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखालील मांजराईदेवी रयत परिवर्तन पॅनेल असे प्रमुख दोन पॅनेल एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

ग्रामपंचायतमध्ये प्रचार तंत्राची वेगवेगळी साधने एकाच वेळी वापरली जाणारी निवडणूक हे या निवडणूकीचे वैशिष्ट्ये ठरत आहे. उमेदवार व निवडणूक चिन्हे योग्यरित्या मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी आकाशात सोडलेले फुगे, फिरत्या एलईडी स्क्रीन, घरोघर फिरणारी लोककलेतील पात्रे, आकर्षक पत्रके, सोशल मिडियावरील क्लीप, एसएमएस, नवनव्या घोषणा याकडे मतदार कुतुहलाने पाहत आहेत. 

हे सगळे असतानाच आतापर्यंत झालेली आणि होऊ घातलेली विकासकामे कोणाची, उमेदवार आणि त्यांचे चरित्र, नागरिकांचा कल आणि विश्र्वास असा लेखा-जोखा दोन्हीही पॅनेलच्या प्रमुखांकडून मांडला जात आहे. 

मांजराईदेवी ग्रामविकास पॅनेलच्या उमेदवारांसाठी सुरेश घुले यांच्यासह सरपंच पदाचे उमेदवार कैलास घुले, जिल्हापरिषद सदस्य दिलीप घुले, पंचायतसमितीचे उपसभापती अजिंक्य घुले, भूविकास बँकेचे माजी अध्यक्ष दत्तात्रय तुपे, ज्ञानोबा घुले, रमेश घुले, अंकुश घुले, सुमन घुले, नंकुमार घुले, पंढरिनाथ शेवाळे, रामदास घुले, बाबासाहेब शिंगोटे, रोहिणी तुपे, कविता गोगावले, संदीप तुपे, बापुसाहेब घुले, राहुल घुले, विठ्ठल भापकर, दिलीप टकले, मंगेश मोरे, भानुदास म्हस्के,दिनकर हरपळे, जितीन कांबळे, 
शिवाजी खलसे, मधुकर घुले हे प्रचारात उतरले आहेत. त्यांच्याकडून होणाऱ्या डावपेचावर या पॅनेलचे यशापयश अवलंबून राहणार आहे. 

सुरेश घुले म्हणाले, "आमदार टिळेकर यांनी गावे पालिकेत घेतो असे सांगून निवडणूकीवर बहिष्कार टाकायला सांगितले, आम्ही त्यावर विश्र्वास ठेवून त्यांना सहकार्य केले. मात्र, त्यांनी सर्व नागरिकांची फसवणूक केली. आता गाव पालिकेत घेण्याएेवजी ते येथील निवडणूकीत रमले आहेत. आम्ही गेली अनेक वर्षात केलेल्या व पाठपुराव्याने होऊ घातलेल्या विकासकामांचे श्रेय या निवडणूकीच्या निमित्ताने ते घेऊ पाहत आहेत. येथील नागरिकांचा माझ्यावर विश्र्वास आहे, ते तो मतदानातून दाखवून देतील आणि मांजराईदेवी ग्रामविकास पॅनेलला विजयी करतील.''

मांजराईदेवी रयत परिवर्तन पॅनेलच्या उमेवारांसाठी आमदार योगेश टिळेकर, सरपंच पदाचे उमेदवार शिवराज घुले यांच्यासह माजी आमदार महादेव बाबर, राजीव घुले, ज्ञानेश्र्वर घुले, बबन घुले, सुनील घुले, नंदकुमार घुले, रमेश घुले, बाबाजी घुले, पुरूषोत्तम धारवाडकर, दिगंबर घुले,संभाजी हाके, सुदाम घावटे, कैलास प्रभुणे, महेश बेल्हेकर, बाळासाहेब घुले, विकास घुले, शंकर घुले, शैलेंद्र बेल्हेकर, अंकुश भोसले, जयराज घुले, उज्वला घुले आदी मातब्बर प्रचारात उतरले आहेत. त्यांच्याकडून थेट मतदारांशी संवाद साधून निवडूण देण्याचे आवाहन केले जात आहे.

आमदार टिळेकर म्हणाले,"मांजरी गाव परिवर्तनाच्या वाटेवर आहे. त्यामुळे प्रस्थापितांच्या विरोधात येथील मोठी तरूणाई एकत्र आलेली आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे मांजरी गावात मी दोनच वर्षात सुमारे शंभर कोटी रूपयांची कामे आणू शकलो. त्यातून रेल्वे उड्डाणपूल, अनेक वर्षापासून रखडलेली पाणी योजना आकारास येत आहे. येथील प्रमुख रस्ते आणि कचऱ्याचा सतावणारा प्रश्र्न आम्ही सोडविला आहे. त्यामुळे मांजराईदेवी रयत परिवर्तन पॅनेलच्याच मागे मतदार विश्र्वासाने उभे राहतील, अशी खात्री आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com