मांजरीत छावणीचे स्वरूप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

मांजरी : कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला प्रतिसाद मिळत असतानाच आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी परिसरात मोर्चा काढल्याने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनीही मोर्चाचे आवाहन केले. त्यामुळे महादेवनगर मांजरी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अनुचित प्रकार घडू नये यासाठी हडपसर पोलीसांनी लागलीच त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त लावल्याने परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. सकाळी महादेवनगर परिसरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत होता. त्याचवेळी आंबेडकरवादी कार्यकर्त्यांच्या एका गटाने रस्त्याने घोषणा देत मोर्चा काढला होता. काही व्यवसायिकांना दुकाने बंद करायला लावली.

काही दुकानांमध्ये जाऊन मोर्चेकऱ्यांनी जबरदस्तीने दुकाने बंद करायला लावली. किरकोळ दगडफेकीचे प्रकारही घडले. त्यामुळे परिस्थिती बिघडत चालली होती. त्यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते हळूहळू एकत्र होऊन त्यांनीही घोषणा द्यायला सुरूवात केली. कार्यकर्ते वाढू लागल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलीसांनी वेळीच दखल घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात राहण्यास मदत झाली. हडपसर पोलीसांची एक तुकडी महादेवनगरमध्ये दाखल झाली होती. दरम्यान, पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त मिलिंद पाटील व विष्णू पवार यांनी प्रमुख कार्यकर्त्यांना बोलावून शांतता राखण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांनीही त्याला प्रतिसाद देत मांजरी पर्यंत मोर्चा काढला. तसेच एकमेकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. विविध व्यवसायिकांसह शाळा, महाविद्यालये बंदमध्ये सहभागी झाल्याने दररोजच्या तुलनेत रस्त्यावरील वाहतूक शांत होती. अनेक नागरिकांनी रस्त्यावर येणे टाळल्याने संपूर्ण परिसरातच शुकशुकाट जाणवत होता. 
 
Web Title: Marathi news pune news manjari strike