मराठी शिक्षण कायदा व्हावा - देशमुख

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

पुणे - 'मराठी भाषा टिकविण्यासाठी "मराठी शिक्षण कायदा' अस्तित्वात आला पाहिजे. या कायद्याद्वारे इंग्रजी शाळांमध्ये मराठी अनिवार्य करण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे,'' असे मत 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.

साहित्यवेध प्रतिष्ठानतर्फे बालगंधर्व कलादालनात व्यंग्यचित्र आणि अर्कचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल देशमुख यांचा या वेळी विशेष सत्कार करण्यात आला. सुरेश लोटलीकर यांनी काढलेली 91 संमेलनाध्यक्षांची अर्कचित्रे आणि दिग्गज व्यंग्यचित्रकारांनी काढलेली चित्रे या प्रदर्शनात मांडली आहेत. माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रा. हरी नरके, कॉसमॉस बॅंकेचे संचालक कृष्णकुमार गोयल, भारत देसडला, सचिन ईटकर, रोहित पवार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास भिंगारे, कोथरूड व्यासपीठाचे अध्यक्ष श्‍याम देशपांडे उपस्थित होते.

'अभिजात'साठी लाक्षणिक उपोषण
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी जनआंदोलन उभारण्याचा प्रारंभ साहित्यवेद प्रतिष्ठानतर्फे आयोजित या कार्यक्रमात झाला. मराठी भाषा दिनाचे (ता. 27 फेब्रुवारी) औचित्य साधून मराठीप्रेमींनी पुणे स्थानक येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ सकाळी अकरा वाजता लाक्षणिक उपोषणासाठी एकत्र यावे, असे भावनिक आवाहन माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

Web Title: marathi news pune news marathi education law laxmikant deshmukh