पुणे - ग्रंथदिंडी, ग्रंथवाचनाने मराठी भाषा दिन साजरा

रमेश मोरे
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि लिटल फ्लॉवर इंग्लिश व मराठी मिडियम शाळेत कविवर्य वि.वा.शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस मराठी भाषा दिन ‘चला वाचुया’ या उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

संस्थेच्यावतीने कविवर्य वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानिमित्त विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडी काढण्यात आली होती. संत ज्ञानेश्‍वर, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत मुक्ताबाई, संत जनाबाई यांच्या वेषभूषेत विद्यार्थी-विद्यार्थीनी ग्रंथदिंडीत सहाशे विद्यार्थी सहभागी झाले होते. तर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विद्यार्थ्यांकडुन सामुहिक प्रार्थना घेण्यात आली. याचबरोबर सामुहिक ग्रंथवाचन, कविता वाचन करण्यात आले.  

‘मराठीची वारी’ हे गीत कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले. मराठी शाळेविषयी पालकांना जागृत करून मराठी भाषेचा प्रसार व प्रचार विद्यार्थ्यांनी गीतातून केला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बाठिया, तेजल कोळसे पाटील, भटू शिंदे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते. 

Web Title: Marathi news pune news marathi language day