स्मार्ट व्हिलेजसाठी शहरातील तरूण पिढी सरसावली

रामदास वाडेकर
शनिवार, 10 मार्च 2018

ग्रामस्थ, ग्रामपंचायत, बालविकास मित्र मंडळ,बजरंग तरूण मंडळ,काळूबाई माता महिला मंडळ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भैरवनाथ माध्यमिक विद्यालय, आंदर मावळ सहकारी दूध उत्पादक संस्थांचे सहभाग घेतला जाणार आहे.तळेगावातील एसडी स्पोर्ट्स अकॅडमीचे सहकार्य लाभत आहे. अधिक माहिती व मदतीसाठी अल्तमश सैय्यद( ८३८०८१०३२५), किरण वाडेकर( ९६८९८९५७३३) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

टाकवे बुद्रुक : लोकसहभागातून स्मार्ट व्हिलेजकडे वाटचाल करण्यासाठी, थेट खेड्यात जावून जनजागृती करण्यासाठी शहरातील तरूण पिढी पुढे सरसावली आहे. युवा मैत्री फाऊंडेशन या बॅनर खाली विशीतील तरूण तरूणी एकवटल्या आहे.

आंदर मावळातील 'वाहनगावात 'स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, निसर्ग संवर्धन, शासकीय योजनांचा लाभ, सुंदर गाव स्वच्छ गाव संकल्पना ही मंडळी पुढच्या तीन महिने येथे राबणार आहे. पथनाट्यातून स्वच्छतेचे महत्व पटवून सारा गाव झाडून ही मंडळी स्वच्छ करणार आहे. गुढीपाडव्याच्या पूर्वेला ते पहिले पाऊल टाकणार आहे.गावतील रस्ते स्वच्छ व लख्ख असावे, सांडपाणी निर्मूलनासाठी शोष खड्डे,स्वच्छतागृह,कच-यातून खत निर्मिती, पाणी व्यवस्थापन,एक घर एक कुंडी असे वेगवेगळे उपक्रम राबविणार आहे. 

गावकऱ्याच्या आर्थिक व सामाजिक स्थितीचा सर्वेक्षण केले जाणार असून शासनाच्या आमआदमी विमा योजना,संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनांच्या लाभार्थ्यांचे फाॅर्म भरून शासकीय कार्यालयात जमा केले जाणार आहे. यासाठी शासनाच्या अनुलोम अॅपचा वापर केला जाणार असून 'मुख्यमंत्री मित्र 'मदत करणार आहे.या कालावधीत गावातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना, गावकऱ्यांना, महिला, रूग्ण, आदिवासी यांना मदतीसाठी दानशूरांच्या आर्थिक मदतीची गरज आहे,प्रत्यक्ष माहिती व खात्री जमा मदत करावी असे आवाहन युवा मैत्री फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. 

ग्रामस्थ, ग्रामपंचायत, बालविकास मित्र मंडळ,बजरंग तरूण मंडळ,काळूबाई माता महिला मंडळ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भैरवनाथ माध्यमिक विद्यालय, आंदर मावळ सहकारी दूध उत्पादक संस्थांचे सहभाग घेतला जाणार आहे.तळेगावातील एसडी स्पोर्ट्स अकॅडमीचे सहकार्य लाभत आहे. अधिक माहिती व मदतीसाठी अल्तमश सैय्यद( ८३८०८१०३२५), किरण वाडेकर( ९६८९८९५७३३) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

Web Title: Marathi news Pune news maval smart village