मानसिक रूग्णांना आदराने वागवा - डॅा. अमर शिंदे

Patients
Patients

हडपसर (पुणे) : समाजामध्ये मानसिक रुग्ण, अल्झायमर व व्यसनी रूग्णांची संख्या वाढत आहे. या आजाराविषयी समाजात पुरेसे ज्ञान नसल्याकारणाने लोक वैद्यकीय उपचार न घेता इतर काही मार्ग स्वीकारतात व या सगळ्यामध्ये रुग्णाची प्रकृती अजून बिघडत जाते. आपण आपल्या फॅमिली डॉक्टरांशी जसा संपर्क ठेवतो, संवाद साधतो, आपल्या समस्या मांडतो तसेच मानसोपचार तज्ज्ञांशी संपर्क साधून लवकरात लवकर उपचार घेतले पाहिजेत. तसेच मानसिक रूग्णांना समाजाने व कुटूंबियाने आदराने व प्रेमाने वागविले पाहिजे, असे मत जागृती पुनर्वसन केंद्राचे संस्थापक व मानसोपचार तज्ञ डॅा. अमर शिंदे यांनी व्यक्त केले. 

व्हेलेंटाईन दिनाचे औचित्य साधून जागृती पुनर्वसन केंद्रामध्ये आयोजीत केलेल्या कार्यक्रमात डॅा. शिंदे बोलत होते. केंद्रातील विस्मृतीचे रूग्ण, मानसोपचारासाठी आलेले रूग्ण तसेच व्यसमुक्तीसाठी आलेले या उपक्रमात सहभागी झाले. यावेळी सगळ्यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात जास्त आनंद देणारे क्षण शेअर केले. एनजीओ या ग्रुपने सर्व रूग्णांकरीता लाडू व चॅाकलेटचे वाटप केले. 

डॉ. शिंदे यांनी यावेळी डिमेन्शिया (स्मृतीभ्रंश) हा आजार नेमका काय आहे व तो झालाय हे कसं ओळखावं ते सांगितलं. ते म्हणाले, डिमेन्शिया, अल्झायमर यांच्यासारख्या आजाराबाबत आपल्याकडे फारशी जागृती नाही. म्हतारपण झाले की स्मरण शक्ती कमी होतेच, हे गृहीत धरले जाते. या आजारात मेंदूची कार्यक्षमता कमी होते. यात स्मरणशक्ती बुद्धिमत्ता, एकाग्रता, भाषाकौशल्य व स्वत:ची काळजी घेण्याची क्षमता मुख्यत: कमी होते. रुग्णाच्या वर्तणूक व स्वभावातही बरेच बदल दिसतात. यात प्रामुख्याने मेंदूची महत्त्वाची कार्य स्मरणशक्ती बुद्धिमत्ता, हातापायाची हालचाल, रोजची कामे याचा विसर पडत जाणे, या सर्व गोष्टी हळूहळू वाढत जातात. मात्र योग्य उपचाराने या आजारावर नियंत्रण ठेवता येते. 

जागृती पुर्नवसन केंद्रात मनोरूग्णांच्या समस्या समजून घेऊन त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन, त्याना योग्य मार्गदर्शन व उपचार या केले जातात. केंद्रामध्ये घरगुती वातावरण असल्यामुळे रुग्णांची प्रकृती लवकर सुधारण्यास मदत होते. केंद्रातर्फे रूग्णांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. सामान्य रुग्णालयाची माहिती जशी नागरिकांना असते, तशीच मानसिक रोगांवरील उपचार पद्धती व उपचार करणाऱ्या केंद्रांची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या केंद्राकडून नियमितपणे जनजागृती केली जाते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com