स्थलांतरीत पक्षांचे संमेलन

संदिप जगदाळे
सोमवार, 25 डिसेंबर 2017

हडपसर : वीर धरण परिसरात देश-परदेशातून स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. स्थलांतरित पाहुण्या पाणपक्ष्यांचे संमेलन पाहण्यासाठी व अभ्यासासाठी पक्षीप्रेमी दुर्बीण, कॅमेरे धरणाच्या किनारी गर्दी करू लागले आहेत. 

यामध्ये प्रामुख्याने दुर्मीळ पट्ट कादंब किंवा कादंब हंस या बदकांसह इतर स्थांलतरीत पाणपक्ष्याचे समावेश आहे. पट्ट कादंब हे तिबेट व लडाख येथून स्थलांतर करून आपल्याकडे येतात. या बदकांचा रंग राखीडा असून पांढ-या डोक्यावर दोन काळे समांतर आडवे पट्टे असातत. चोच व पाय पिवळ्या रंगाचे असतात. नर व मादी दिसायला सारखेच असतात. 

हडपसर : वीर धरण परिसरात देश-परदेशातून स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. स्थलांतरित पाहुण्या पाणपक्ष्यांचे संमेलन पाहण्यासाठी व अभ्यासासाठी पक्षीप्रेमी दुर्बीण, कॅमेरे धरणाच्या किनारी गर्दी करू लागले आहेत. 

यामध्ये प्रामुख्याने दुर्मीळ पट्ट कादंब किंवा कादंब हंस या बदकांसह इतर स्थांलतरीत पाणपक्ष्याचे समावेश आहे. पट्ट कादंब हे तिबेट व लडाख येथून स्थलांतर करून आपल्याकडे येतात. या बदकांचा रंग राखीडा असून पांढ-या डोक्यावर दोन काळे समांतर आडवे पट्टे असातत. चोच व पाय पिवळ्या रंगाचे असतात. नर व मादी दिसायला सारखेच असतात. 

अॅनाटिडी या पक्षी कुळातील पट्ट कादंब गहू, हरबरा तसेच गवताचे हिववे देठ यावर गुजराण करतात. काहीसे रात्रींचर (रात्री संचार करणारे) कादंब हंस भल्या सकाळीच शेत, हिरव्या शिवारांवर हजेरी लावून कोवळी पिके पशत्त करतात. कादंब हसे हिमालयाच्या कुशीतील जलायशयांच्या काठावर घरटे करतात, यांचा वीणीचा हंगमा एप्रिल ते जून आहे. मादी तीन-चार पांढ-या रंगीचा अंडी घालते. थंडी ओसरली की आपल्याकडील मुक्काम संपवून कादंब हंस मायदेशी परतता. रात्री निरभ्र आकाशातून पट्ट कादंब इंग्रजी व्ही (व्ही) आकारात उडत जातात. 

त्याचबरोबर पांढऱ्या मानेला काळ्या पंखांचे आवरण, पाण्यातून वाढ काढत चिटुकल्या चोचीने भक्ष्य टिपणारा शेकाट्या... पाण्यात विहार करताना पंखांवर सूर्यकिरणे पडल्यावर लक्ष वेधून घेणारी चक्रवाक बदके... डोक्‍यावरचा शुभ्र तुरा मिरवत चमच्यासारख्या आकाराची लांबसडक चोच दलदलीत घुसळून मासे टिपणारा चमचा करकोचा आणि आकाशातून पाण्यात ‘लॅंड’ होताना लक्ष वेधून घेणारे गुलाबी-काळ्या पंखाचे चित्रबलाक देखील येथे पहावयास मिळत आहेत. वीर धरण परिसरात सध्या पट्ट कादंबनांना पाहण्यासाठी पक्षीप्रेमींची गर्दी वाढली आहे. 

पट्ट कादंबाशिवाय या जलाशयावर ब्राम्हणी डत, शेंडी बदक, उघडचोच बलाक, शऱाटी. निदीसुरय, पाणकावळे, ब्राम्हणी घार, टिटिवी, चम्पेवाला प्लवर, तुतवार, पाण भिंगरी आदी अनेकविध पक्षी पाहण्याची पक्षीप्रेमींना पर्वणी आहे, अशी माहिती पक्षी अभ्यासक विशाल तोरडे यांनी सकाळशी बोलताना दिली. 

येथे परदेशी स्थलांतरित पक्ष्यांबरोबरच स्थानिक स्थलांतरित (भारतीय) पक्ष्यांमध्ये राखी बदक (स्पॉटबिल्डक), टिबुकली (डॅबचिक), पाणकावळा (लिटल कॉर्मोरेंट), काळा शराटी (ब्लॅक आयबिस), पांढरा शराटी (व्हाइट आयबिस), ताम्र शराटी (ग्लॉसी आयबिस), जांभळा बगळा (पर्पल हेरॉन), चित्रबलाक (पेंटेड स्टॉर्क), राखी बगळा (ग्रे हेरॉन), पाणथळ चरचरी (पॅडी फील्ड पिपिट), वंचक (पॉन्ड हेरॉन), मोठा बगळा (लार्ज इग्रेट), गाय बगळा (कॅटल इग्रेट), छोटा बगळा (लिटल इग्रेट), तुतवार (कॉमन सॅंड पायपर), चष्मेवाला प्लवर (लिटल रिंग्ड प्लवर), काजळ घार (ब्लॅक ईअर्ड काईट), जंगल मैना आदी पक्षी दाखल झाले आहेत. 

धरणावर पोहचात पाखरांच्या कंठातून बरसणारी मधुर व मंजूळ गाणी कानावर येतात. चक्रवाक ‘आँग आँग’ असा आवाज करत असतात. टिटव्यांची ‘टिव टिव’ अखंडपणे सुरू असते. काठावरच्या चिखलात तुरुतुरू चालत कीडे-कीटक टिपणारे शेकाटे ‘पिउ पुउ’ असा गोड सूर आळवतात. धोबी किलकिलाटी तान हवेत सोडून देतो तर काठावरच्या काटेरी वनातून येणारी तांबोल्यांची कर्ण सुखद तान मन उल्हसित करते.

दिवाळीनंतर रानावनातील हिरवे गवत हळूहळू पिकून पिवळे पडते. अंगाला झोंबणारा वारा गुलाबी थंडी घेऊन येतो. सृष्टी धुक्‍याची तरल चादर पांघरते. हिवाळ्यात लाखोंच्या संख्येने परदेशातील विविध प्रजातींचे पक्षी हिवाळा सुसह्य करण्यासाठी वीर धरणावर दाखल होतात. 

स्थलांतर हा पक्षिजीवनातील एक अनाकलनीय अध्याय आहे. पृथ्वीतलावर उत्तर धृवापासून दक्षिण धृवापर्यंत पक्ष्यांची निवासस्थाने आढळतात. मात्र हवामानातील तीव्र बदलामुळे या ठिकाणच्या पक्ष्यांना वर्षातील काही दिवस आपले मूळ वस्तीस्थान सोडून दुसरीकडे स्थलांतर करावे लागते. स्थलांतर करून आलेले हे पक्षी आपल्याकडे कवडी पाटबरोबरच पुण्याजवळील भिगवण, पाषाण तलाव, वीर धरण या परिसरांत पाहायला मिळतात. कवडी पाट येथे सध्या या पाहुण्या पक्ष्यांना पाहण्यासाठी पक्षिप्रेमी गर्दी करत असल्याचे तोरडे यांनी नमूद केले.  

Web Title: Marathi news pune news migrated birds