मिलिंद एकबोटेंना अखेर अटक

वृत्तसंस्था
बुधवार, 14 मार्च 2018

कोरेगाव-भीमामध्ये हिंसाचार भडकावल्याचा आरोप असलेले मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व अर्ज सर्वोच्च न्यायालयाने आज (बुधवारी) फेटाळला. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. पुणे ग्रामीण पोलिसांनी त्यांना अटक केली. 

पुणे : कोरेगाव-भीमामध्ये हिंसाचार भडकावल्याचा आरोप असलेले मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व अर्ज सर्वोच्च न्यायालयाने आज (बुधवारी) फेटाळला. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. पुणे ग्रामीण पोलिसांनी त्यांना अटक केली. यापूर्वी उच्च न्यायालयानेही एकबोटेंचा जामीन अर्ज फेटाळला.

कोरेगाव-भीमा येथील हिंसाचार भडकवल्याचा आरोप मिलिंद एकबोटे यांच्यावर आहे. त्यांनी अंतरिम जामीन मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन देण्यास नकार दिला. त्यानंतर एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार असल्याचे सांगितले जात होते. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना लगेचच अटक करण्यात आली.

दरम्यान, राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला होता. या अहवालात एकबोटे तपासात सहकार्य करत नसल्याचे म्हटले होते. या अहवालावरुन सर्वोच्च न्यायालयाने एकबोटेंना जामीन देण्यास नकार दिला.

Web Title: Marathi News Pune News Milind Ekbote Arrested by pune rural police