आमदार भरणे यांची अपघातामध्ये तत्परता

राजकुमार थोरात
मंगळवार, 16 जानेवारी 2018

जंक्शनजवळील बोरी पाटी येथे काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास नातेपुते येथील बागवान कुंटूंब कळसहून जंक्शन मार्ग नातेपुतेला चालले होते. या रस्त्याने डांबरीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले असल्याने चारचाकी गाडीचा वेग जास्त होता.बोरीपाटीजवळील वळण चालकाच्या लक्षात आले नसल्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने चारचाकी विजेच्या खांबाला जोरदार धडकली.

वालचंदनगर : जंक्शन (ता.इंदापूर) जवळील बोरी पाटी येथे रात्री अकरा वाजता झालेल्या अपघातामधील जखमी व नागरिकांना आमदार दत्तात्रेय भरणे यांनी दिलासा देवून रुग्णालयापर्यंत पोचविण्याची व्यवस्था केली.

जंक्शनजवळील बोरी पाटी येथे काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास नातेपुते येथील बागवान कुंटूंब कळसहून जंक्शन मार्ग नातेपुतेला चालले होते. या रस्त्याने डांबरीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले असल्याने चारचाकी गाडीचा वेग जास्त होता.बोरीपाटीजवळील वळण चालकाच्या लक्षात आले नसल्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने चारचाकी विजेच्या खांबाला जोरदार धडकली. गाडीमध्ये सहा जण प्रवाशी होते.गाडीने समोरुन धडक दिल्याने गाडीतील एअरबॅग ओपन झाल्याने मोठी दुर्घटना टळली. एक व्यक्ती जखमी झाला होता. जोरदार झालेल्या अपघातामुळे गाडीच्या पुढचा भाग चक्काचुर झाला होता. सर्व प्रवाशी घाबरलेल्या अवस्थेमध्ये होते.

रस्त्याने ये-जा करणारे वाहने अपघात पाहून न थांबताच निघून जात होते.याच वेळेमध्ये आमदार दत्तात्रेय भरणे कळंब (ता.इंदापूर)येथील कार्यक्रम अाटोपून  जंक्शन मार्ग पुण्याला चालले होते.अपघात पाहताच आमदार भरणे थांबले अपघातामध्ये जखमी व इतर नागरिकांना धीर देवून रस्त्याने जाणारे वाहने थांबवली व तातडीने जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी लासुर्णेमधील दवाखान्यात पोचवले.आमदार भरणे यांच्या तत्परतेचे सगळीकडे कौतुक होत आहे. वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनाही अपघाताची घटना समजताच त्यांनी तातडीने पोलिसांना घटनास्थळी पाठवले.रात्री उशीरापर्यंत या घटनेची वालचंदनगर पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.

Web Title: Marathi news Pune news MLA Datta Bharne help