पुणे : 'एमएनजीएल'च्या कामादरम्यान नळजोड तुटले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

हडपसर : हांडेवाडी रस्त्यावर महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून भूमिगत पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू असून खोदाईमुळे अनेक सोसायटी व घरांचे नळजोड या कामात तुटले आहेत. त्यामुळे नागरिकांना विकत टँकरचे पाणी घेण्याची वेळ आली आहे.

नागरिकांनी नळजोड तुटता कामा नयेत यासाठी विनंती करूनही हे काम सुरू असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. 

एसीपी वास्तू सोसायटीतील रहिवासी ओम करे म्हणाले, कंपनीकडून खोदाईचे काम रात्री केले जाते. सदर रस्ता आधीच लहान असल्यामुळे रस्ता अजून खराब होत आहे. सदर ठिकाणाहून महापालिकेची जलवाहिनी जाते. अनेक सोसायट्या व घरांना या वाहिनीतून नळजोड दिले आहेत. परंतु याची परवा न करता काम रात्री केले जाते आणि कनेक्शन तोडले जात आहेत. आमच्यासह अनेक सोसयटयांमध्ये नळजोड तुटल्याने पाणी येत नाही. त्यामुळे टँकरने पाणी आणावे लागत आहे. सदर काम त्वरित थांबवून सर्व नळजोड जोडून देण्यात यावेत.

पथ विभागाचे प्रभारी उपअभियंता हनुमान खलाटे म्हणाले, ''महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीने महापालिकेकडून खोदाईसाठी परवानगी घेतली आहे. खोदाईत नळजोड तुटल्याची अद्याप तक्रार आलेली नाही. खोदकामात जर नळजोड तुटले असतील तर काम थांबवून तातडीने ते जोडण्यात येतील.

Web Title: marathi news pune news MNGL Hadapsar