सामुदायिक विवाह ही चळवळ व्हावी - रोहित पवार 

संतोष आटोळे
सोमवार, 25 डिसेंबर 2017

शिर्सुफळ : अनिष्ट रूढी, परंपरा यांना फाटा देऊन प्रतिष्ठा संभाळण्यासाठी लग्नकार्यासाठी कर्जबाजरी न होता वेळ व पैसा वाचवा या साठी समुदायिक विवाह सोहळ्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. तसेच सामुदायिक विवाह सोहळा ही चळवळ होण्यासाठी प्रयत्न व्हावे असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी केले. सावळ (ता.बारामती) येथील जनसेवा विकास प्रतिष्ठान व धनश्री महिला पतसंस्था यांच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळयाच्या प्रसंगी पवार बोलत होते.

शिर्सुफळ : अनिष्ट रूढी, परंपरा यांना फाटा देऊन प्रतिष्ठा संभाळण्यासाठी लग्नकार्यासाठी कर्जबाजरी न होता वेळ व पैसा वाचवा या साठी समुदायिक विवाह सोहळ्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. तसेच सामुदायिक विवाह सोहळा ही चळवळ होण्यासाठी प्रयत्न व्हावे असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी केले. सावळ (ता.बारामती) येथील जनसेवा विकास प्रतिष्ठान व धनश्री महिला पतसंस्था यांच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळयाच्या प्रसंगी पवार बोलत होते. यावेळी नगरसेवक किरण गुजर, समीर चव्हाण, पंचायत समितीचे माजी सभापती करण खलाटे,  खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय आवाळे, आप्पासो आटोळे, पांडुरंग चौधर, संतोष आटोळे, सागर आटोळे, श्रीरंग जमदाडे, रोहित चौधर, लक्ष्मण मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजवंत यांनी या विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन समाज कार्याची संधी निर्माण करून दिली आहे. धनश्री पतसंस्थेच्या वतीने मोफत समुदायिक विवाह सुरु राहतील व तरुणांनी या मध्ये विवाह करून इतरांना आदर्श ठेवावा असे मत धनश्री पतसंस्थेचे मार्गदर्शक बापूसाहेब बिबे यांनी व्यक्त केले. या वेळी सहभागी जोडप्यांना संसार उपयोगी वस्तू मोफत देण्यात आले त्याच प्रमाणे सर्व वऱ्हाडी मंडळी स्नेहभोजन व मनोरंजनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समुदायिक विवाह सोहळ्यात मदत करणाऱ्या व्यक्तीचा रोहित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अनिल सावळे पाटील यांनी केले. पोलीस पाटील पदी नियुक्ती झाल्याबद्दल व इतर क्षेत्रामध्ये उलेख्नीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार या प्रंसगी करण्यात आला. उपस्थितांचे स्वागत पतसंस्थेच्या चेअरमन राणीताई बिबे व उपाध्यक्षा सुनिता आवाळे यांनी केले.

 

Web Title: Marathi news pune news movement of community marriage