एजंटांना थारा न देण्याचे महावितरणचे आवाहन 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

पुणे : महावितरणमध्ये नवीन वीजजोडणी, वाढीव वीजभारमंजुरी, नावात बदल आदींबाबतची प्रक्रिया सुटसुटीत व पारदर्शक करण्यात आली आहे. मात्र या कामांसाठी कोणत्याही स्वयंघोषित एजंटांना वीजग्राहकांनी थारा देऊ नये, असे स्पष्ट आवाहन महावितरणने केले आहे. 

महावितरणचे संकेतस्थळ किंवा मोबाईल ऍपद्वारे नवीन वीजजोडणीसाठी अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांनी या सेवेचा लाभ घ्यावा. आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर प्रशासकीय दिरंगाई होत असल्याची तक्रार असल्यास 1800-200-3435 व 1800-233-3435 किंवा 1912 या तीन टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा.

याशिवाय मुंबई येथील मुख्यालयात विशेष मदत कक्ष सुरू करण्यात आला असून 022-26478989 किंवा 022-26478899 या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. ट्‌वीटरच्या माध्यमातूनसुद्धा ग्राहकांना तक्रारीचा निपटारा करता येऊ शकेल. 

नवीन वीजजोडणी, वीजभारमंजुरी, नावांत बदल आदी विविध सेवांसाठी पद्मावती, रास्ता पेठ, नगर रस्ता, पर्वती व बंडगार्डन विभागातील ग्राहकांनी रास्ता पेठ येथील ग्राहक सुविधा केंद्रात; तसेच कोथरूड विभागातील ग्राहकांनी एसएनडीटी महाविद्यालयाजवळील ग्राहक सुविधा केंद्राशी, शिवाजीनगर विभागातील ग्राहकांनी चतुःशृंगी मंदिरासमोरील ग्राहक सुविधा केंद्राशी; तर पिंपरी, भोसरी विभागातील ग्राहकांनी पिंपळे सौदागर येथील ग्राहक सुविधा केंद्राशी संपर्क साधावा, असेही महावितरणने म्हटले आहे. 

पुण्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: marathi news pune news MSEDCL Pune