विजेच्या धक्क्याने शेतकर्‍याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

टाकळी हाजी : मलठण ( ता. शिरूर ) येथे शेतात तुटलेल्या तारांना स्पर्श झाल्याने शेतकरी पोपट पांडूरंग गायकवाड ( 48 ) यांचा मृत्यू झाला. या परिसरात लांबकळलेल्या तारा असल्याने ही घटना घडली. अनेक वेळा महावितरणला तक्रारी केल्या; मात्र संबधित वायरमन निवृत्त होण्यास कमी कालावधी असल्याने ग्रामस्थांनी त्याला पाठीशी घातले. अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष तरूणाच्या मृत्यूला कारणीभुत असल्याचे दिसून येत आहे.

टाकळी हाजी : मलठण ( ता. शिरूर ) येथे शेतात तुटलेल्या तारांना स्पर्श झाल्याने शेतकरी पोपट पांडूरंग गायकवाड ( 48 ) यांचा मृत्यू झाला. या परिसरात लांबकळलेल्या तारा असल्याने ही घटना घडली. अनेक वेळा महावितरणला तक्रारी केल्या; मात्र संबधित वायरमन निवृत्त होण्यास कमी कालावधी असल्याने ग्रामस्थांनी त्याला पाठीशी घातले. अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष तरूणाच्या मृत्यूला कारणीभुत असल्याचे दिसून येत आहे.

शिरूर तालुक्यातील मलठण गावात विजेच्या अनेक समस्या आहेत. यामुळे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व पंचायत समिती सदस्य डॅा. सुभाष पोकळे यांच्या उपस्थितीत जनता दरबार भरविण्यात आला होता. त्यावेळी येथील विजेच्या समस्यांचा पाढा वाचण्यात आला होता. या परिसरात लोबंकळणाऱ्या तारा हा विषय शेतकऱ्यांसाठी घातक विषय होता.

रात्रीचे भारनियमन असले तरी धोकादायक स्थितीत शेताला पाणी देण्यासाठी लोंबकळणाऱ्या तारांमुळे अपघात घडू शकतात. यासाठी येथील ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. त्यावेळी खासदार आढळराव पाटील यांनी येथील अधिकाऱ्यांना या बाबत दक्षता घेण्यास सांगितले होते. असे असताना येथील विजेच्या तारांच्या समस्या सुटल्या नसून विजेच्या अपघाताना सामोरे जावे लागत आहे.

गुरूवार ( ता. 8 ) सकाळी शेतात मक्याच्या शेताला पाणी देण्यासाठी शेतकरी पोपट पांडूरंग गायकवाड हे गेले होते. त्याच्या शेतात लोबकळणाऱ्या तारा होत्या. त्यांना या तारेतून विजेचा स्पर्श झाला. त्यावेळी त्यांचा जागीच मृत्यू झाला. विरूद्ध दिशेला घासाच्या शेतात काम करणाऱ्या त्यांच्या पत्नी घरी येऊन पती कुठेही दिसत नसल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांचे भाऊ या दिशेने मोबाईलवरून शोध घेऊ लागले. त्यावेळी त्यांना हाताजवळ विजेच्या ताराचा स्पर्श झाल्याने भाऊ बेशुद्ध अवस्थेत असलेला दिसला.

त्यावेळी त्यांनी खासगी दवाखान्य़ात त्यांना घेऊन गेले. त्यावेळी त्यांना मृत घोषित करण्यात आले. शिरूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून पोलीस स्टेशनला पंचनामा केला असल्याची माहिती राष्ट्रवादी कॅाग्रेसचे सरचिटणीस सुरेश गायकवाड यांनी दिली.

या घटनेला दोन दिवस होऊन देखील संबधीत ठिकाणी महावितरण अथवा पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली नसल्याचे या कुटूंबाने सांगितले. या सर्व अधिकाऱ्यांनवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पंचायत समिती सदस्य डॅा. सुभाष पोकळे यांनी सांगितले.

1972 नंतर या भागात असणाऱ्या विजेच्या तारांची कामे झाली नाहित. महावितरणच्या दुर्लक्षीतपणामुळे ही घटना घडली असून तरूण शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. अशा अनेक घटना या परीसरात घडल्या आहेत. या संदर्भात स्थानीक वायरमन ला पाठीशी घालत असल्याचे येथील शेतकरी सुदाम गायकवाड, संपत गायकवाड, किरण देशमुख, प्रकाश गायकवाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पाबळ, कान्हूर मेसाई या परीसरात देखील लोंबकळणाऱ्या तारांचा गंभीर प्रश्न असल्याचे येथील नागरीक सांगत आहेत.

Web Title: marathi news pune news MSEDCL Pune