पुणे: माळवाडीत मुलाने केला आईचा खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

मीना बाळासाहेब दाभाडे (55,शितळादेवी मंदिर शेजारी ता.जि. पुणे) असे दुर्दैवी आईचे नाव आहे.याप्रकरणी मयताचे दीर शांताराम सीताराम दाभाडे (65,माळवाडी शितळादेवी मंदिर शेजारी ता.जि. पुणे) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली

तळेगाव स्टेशन : किरकोळ भांडणाच्या कारणावरुन मनात राग धरून मुलानेच लोखंडी गॅस सिलिंडरची टाकी डोक्यात मारुन सख्ख्या आईचा खून केल्याची घटना तळेगावजवळील माळवाडी येथे मंगळवारी (ता.२७) रात्री उशीरा शितळादेवी मंदिरासमोर घडली.

मीना बाळासाहेब दाभाडे (55,शितळादेवी मंदिर शेजारी ता.जि. पुणे) असे दुर्दैवी आईचे नाव आहे.याप्रकरणी मयताचे दीर शांताराम सीताराम दाभाडे (65,माळवाडी शितळादेवी मंदिर शेजारी ता.जि. पुणे) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपी राम बाळासाहेब दाभाडे (27, माळवाडी शितळादेवी मंदिर शेजारी ता.जि. पुणे) याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अरविंद हिंगोले करत आहेत.मृृृृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Web Title: Marathi news Pune news murder