पुणे: धायरी परिसरात तरुणाचा डोक्यात दगड घालून खून

राजेंद्रकृष्ण कापसे 
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

सिंहगड पोलिसांनी याप्रकरणी सुधीर घुगे, विशाल वाघ आणि विकास पोकळे (तिघेही रा. धायरी) या तिघांना अटक केली आहे.

खडकवासला : जुन्या भांडणाच्या कारणावरून अभिषेक बाळासाहेब पोकळे याचा धायरी येथील गणेशनगरमध्ये खून केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तिघांना अटक केली आहे.
 
पोकळे याची हल्ला करणाऱ्या तिघा जणांची काही दिवसांपूर्वी भांडणे झाली होती. त्या तीन जणांनी रविवारी मध्य रात्री विटांनी मारहाण करून जखमी केले. त्यानंतर तेथील मोठा दगड तीन चार वेळा डोक्यात टाकून धायरी गणेशनगर येथे खून केला आहे. यानंतर या परिसरात घबराटीचे वातावरण आहे. सिंहगड रोड पोलिसांनी त्या तिघांना अटक केली आहे.

सिंहगड पोलिसांनी याप्रकरणी सुधीर घुगे, विशाल वाघ आणि विकास पोकळे (तिघेही रा. धायरी) या तिघांना अटक केली आहे.

 

Web Title: Marathi news Pune news murder in Dhayri