त्यांचं काही नुकसान झालं नाही, पण मनसेचे एक मत गेले: नाना

Nana Patekar
Nana Patekar

पुणे : "त्यांचं काही नुकसान झालं नाही. पण, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक मत गेले,'' असे म्हणत अभिनेते नाना पाटेकर यांनी "मनसे' अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लावला. 

एल्फिस्टीन स्थानकावरील दुर्घटनेनंतर "मनसे'ने फेरीवाल्यांविरोधात जोरदार आंदोलन पुकारले होते. याचा धागा पकडून पाटेकर यांनी फेरीवाल्यांची बाजू मांडली होती. त्यानंतर ठाकरे यांनी त्यांच्या खास "ठाकरे शैलीत' पाटेकर यांचा समाचार घेतला होता. "मराठी चित्रपटांवर बंदी घातली असताना नाना पाटेकर का बोलत नाहीत,' असा सवालही त्यांनी विचारला होता.

त्या पार्श्‍वभूमिवर पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील दीक्षांत संचलनासाठी नाना पाटेकर यांनी विशेष उपस्थिती लावली होती. त्या वेळी पत्रकारांनी राज ठाकरे यांच्या बद्दल विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना पाटेकर म्हणाले, "प्रत्येकाला जे वाटते ते मांडण्याचा अधिकारी आहे. ते त्यांनी मांडले. कोणी काय बोलायचे हे मी कसं ठरवणार? यातून त्यांचं काही नुकसान झालं नाही. फक्त त्यांचे एक मत गेलं. मनसेचे फक्त एक मत गेले.'' 

"फेरीवाल्यांची जागा एकदा ठरवा. नको त्या जागेवर बसले की मगं त्यांना हुसकावून,'' असेही त्यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com