बारामतीच्या ज्ञानसागरने राष्ट्रीय स्तरावर फडकवला महाराष्ट्राचा झेंडा  

Dnyansagar
Dnyansagar

शिर्सुफळ (पुणे) : सावळ ( ता.बारामती) येथील ज्ञानसागर इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राजस्थान येथे पार पडलेल्या स्काऊट गाईडच्या राष्ट्रीय रिजनल लेव्हल कब उत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करीत अभिनय स्पर्धा, लोकनृत्य स्पर्धा, विशाल गर्जना स्पर्धा, मॉडेल मेकिंग स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, स्टोरी टेलिंग स्पर्धा असे एकूण सात स्पर्धात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.यामुळे प्रथमच राष्ट्रिय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्वल केले.

राजस्थान येथे दि. 02 फेब्रुवारी ते 06 फेब्रुवारी दरम्यान स्काऊट गाईडच्या राष्ट्रीय रिजनल लेव्हल कब उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देशातील गोवा, छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान यांसह अन्य राज्याचे संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत बारामती तालुक्यातील सावळ येथील ज्ञानसागर गुरुकुलच्या सहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या राष्ट्रीय उत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्र राज्याने अभिनय स्पर्धा, लोकनृत्य स्पर्धा, विशाल गर्जना स्पर्धा, मॉडेल मेकिंग स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, स्टोरी टेलिंग स्पर्धा असे एकूण सात स्पर्धात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवून महाराष्ट्राने पहिल्यांदाच राजस्थानमध्ये इतिहास घडवला आहे.

हे पारितोषिक राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिलकुमार गुप्ता, मंडल रेल प्रमुख अनिल दुबे, उत्सव प्रमुख महेंद्र शर्मा व विभागप्रमुख घनश्याम व्यास, ललीतजी मिश्रा यांच्या हस्ते ज्ञानसागर चे विद्यार्थी निखिल बंडगर, स्वयम् कुंभार, समर्थ बंडगर, विनय आटोळे, ओंकार अनुसे, अमित कोळेकर, अनिल काशिद व संस्थेचे संस्थापक सागर आटोळे यांच्याकडे प्रदान करण्यात आला. 

या विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यासाठी सागर लाड, दिपक बिबे, अरुण जगताप, प्रशांत इवरे, पल्लवी सांगळे, राधा नाळे, नीलिमा देवकाते, अंजली शिंदे, कांचन काटे, सोनाली गिरमे, स्वप्नाली बागल,  सुनिता पिसे, कौशल्या वनवे, पद्मिनी लकडे, धनश्री बडवे, सारिका पवार, सोनाली सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. सर्वांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष सागर आटोळे, उपाध्यक्षा रेश्मा गावडे,सचिव मानसिंग आटोळे, उपसचिव अल्का आटोळे, मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे यांनी केले.तर ज्ञानसागर गुरुकुलच्या या सहाही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या प्रतिनिधित्वाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल महाराष्ट्र राज्य स्काऊट गाईड संस्थेचे अध्यक्ष ज्ञानोबा मुंढे यांनी विद्यार्थ्यांचे व शाळेचे विशेष अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com