नीरा नदी काठचे शेतकरी पाण्यासाठी आक्रमक

राजकुमार थोरात
सोमवार, 12 मार्च 2018

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील नीरा नदी कोरडी पडली असून नदीकाठच्या गावामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. हजारो एकरातील पिके धाेक्यात आली आहेत. नदीमध्ये पाणी सोडण्याची मागणी करुन ही प्रशासन वेळकाढूपणा करीत असल्याने नदीकाठचे शेतकरी आक्रमक झाले असून तातडीने नदीमध्ये पाणी न सोडल्यास रास्तारोको करण्याचा इशारा दिला आहे.

इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील बागायती क्षेत्रामध्ये वाढ झाल्याने चालू वर्षी इंदापूर तालुक्यातील नीरा नदीवरील कोल्हापूरी पद्धतीचे बंधारे कोरडे पडले आहेत. बंधाऱ्यामध्ये पाणी नसल्यामुळे नदीकाठची हजारो एकरातील उभी असलेले पिके धोक्यात आली असून जळण्याच्या मार्गावर आहेत.तसेच जनावरांच्या पाण्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न ही गंभीर झाला आहे.नदी कोरडी असल्यामुळे नदी काठच्या अनेक गावातील पाणी पुरवठ्याच्या योजना ही बंद पडल्या आहेत. 

नीरा खोऱ्या साखळीमध्ये धरणामध्ये चांगला पाणीसाठा उपलब्ध असून नदीकाठच्या कळंब, निमसाखर, निरवांगी, दगडवाडी, खोरोची, पिठेवाडी, चाकाटी, बोराटवाडी, सराटी, निरनिमगाव, भगतवाडी व माळशिरस तालुक्यातील बांगर्डे, पळसमंडळ, उंबरे, कदमवाडी परीसरातील शेतकरी गेल्या एक महिन्यापासुन पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी, जलसंपदा खात्याकडे नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. मात्र प्रशासनाने टाळाटाळ करीत असून आज (ता.१२) इंदापूर तालुक्यातील नदीकाठच्या गावातील सरपंच व शेतकऱ्यांनी निरवांगी येथे पाण्यासाठी बैठक घेऊन शेतकरी बचाव समितीची स्थापना करुन नीरा नदीमध्ये तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली असून १९ मार्च पर्यंत पाणी न सोडल्यास निरवांगी येथे रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.यावेळी निरवांगीचे सरपंच दशरथ पोळ, पिठेवाडीचे पप्पा बंडगर, चाकाटीचे  रामभाउ पाटील यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Marathi news pune news neera river farmers aggressive