निरवांगीच्या प्राथमिक शाळेची इमारत धोकादायक

राजकुमार थोरात 
शुक्रवार, 16 मार्च 2018

वालचंदनगर (पुणे) : निरवांगी (ता.इंदापूर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची इमारतीची पाठीमागची भिंत कोसळली असल्याने इमारत धोकादायक झाली अाहे. 

येथे जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंत प्राथमिक शाळा आहे. इमारतीचे बांधकाम जुने झाले असून भिंती ढासळू लागल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपूर्वी शाळेच्या इमारतीमधील शेवटच्या खोलीच्या भिंती ढासळल्याने खोली बंद ठेवण्यात आली आहे.

महिन्यापूर्वी बंद असलेल्या खोलीची शेजारची दुसऱ्या वर्गाची भिंत पाठीमागच्या बाजूने ढासळली असल्याने संपूर्ण इमारतीला धोका निर्माण झाला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना खेळाण्यासाठी पाठीमागच्या व पुढच्या बाजुला मैदान असल्याने अनेक विद्यार्थी पडलेल्या भिंतीच्या परीसरामध्ये खेळत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून शाळेसाठी नव्याने इमारत मंजूर करण्याची मागणी माजी सरपंच दशरथ पोळ व ग्रामस्थांनी केली आहे. 
 
Web Title: Marathi news pune news nirvangi primary school in danger condition