जुनी सांगवीत तृतीय पंथीयांच्या हस्ते ध्वजारोहण

 रमेश मोरे
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

सिझन सोशल वेल्फेअर ट्रस्टचे प्रशांत शितोळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर शिवरत्न शंभुराजे वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने तृतीय पंथीयांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सामाजिक एकोपा राहण्यासाठी मंडळाने तृतीयपंथीयांना कार्यक्रमास निमंत्रित करून त्यांच्या हस्ते तुळशी रोप व मुलांना खाऊ वाटप केले.

जुनी सांगवी : पिंपरी-चिंचवड शहराचे उपनगर असलेल्या जुनी सांगवीत विविध सामाजिक संस्था, शाळांमधून प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. येथील महापालिकेच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शाळेत स्थानिक नगरसेवक संतोष कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगरसेवक हर्षल ढोरे, माई ढोरे, शारदा सोनवणे यांनी उपस्थिती लावली.  

अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या वतीने विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढली. विविध गुणदर्शन कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. यावेळी अरविंद ऐज्युकेशन सोसायटीच्या आरती राव, माजी स्थायी अध्यक्ष अतुल शितोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. मृत्युंजय एज्युकेशन सोसायटीच्या नृसिंह विद्यालय, जनता शिक्षण संस्थेच्या मराठी प्राथमिक शाळा, फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन, राहुल तरूण मंडळ,  सिझन सोशल वेल्फेअर ट्रस्ट, समर्थ मित्र मंडळ, सावित्रीबाई फुले सामाजिक संस्था, मधुबन मित्र मंडळ, समर्थ मित्रमंडळ आदी ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.

सिझन सोशल वेल्फेअर ट्रस्टचे प्रशांत शितोळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर शिवरत्न शंभुराजे वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने तृतीय पंथीयांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सामाजिक एकोपा राहण्यासाठी मंडळाने तृतीयपंथीयांना कार्यक्रमास निमंत्रित करून त्यांच्या हस्ते तुळशी रोप व मुलांना खाऊ वाटप केले.

Web Title: Marathi News pune news old sangvi flag hosted by third gender