जुन्नरला आयकर मार्गदर्शन कार्यशाळा

दत्ता म्हसकर
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

जुन्नर : आयकर विवरणपत्र भरण्याची ऑन लाईन प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे.करदात्यांनी त्याचे आयकर विवरण पत्र बिनचूक व वेळेवर दाखल करणे त्यांच्या फायद्याचे असल्याचे अप्पर आयकर आयुक्त प्रशांत गाडेकर यांनी येथे सांगितले.

जुन्नर येथे मंगळवार ता.27 रोजी  आयकर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी करदात्यांना त्यांनी मार्गदर्शन केले त्यांच्या शंकाचे निरसन केले. 

मिळकत खरेदी-विक्री, विमा पॉलिसी, शेअर्स, लग्न समारंभ, बँकेतील कॅश, फिक्स डिपॉझिट आदि विविध व्यवहारांची माहिती आयकर विभागाकडे उपलब्ध होत असल्याने करदात्यांनी विवरणपत्र न भरल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी संयुक्त आयकर आयुक्त अजय ढोके, सहाय्यक आयकर आयुक्त नागनाथ पासले यांनी विविध विषयांवरील व्यापाऱ्यांच्या प्रश्नाचे समाधान केले.

नगराध्यक्ष शाम पांडे, राजेंद्र लुणावत, कन्हैया खोत, विनायक कर्पे,  धनंजय चव्हाण शहरातील विविध क्षेत्रातील  करदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  करसल्लागार सुनिल सोनपाटकी, विशाल खोपडे, संजय ढेकणे, सागर ताजणे, इम्तियाज चौगुले या कार्यशाळेचे संयोजन केले.

Web Title: marathi news pune news Online Income Tax filing