बीआरटी विरोधात नागरिकांच्या सह्यांची मोहिम

संदिप जगदाळे
गुरुवार, 18 जानेवारी 2018

हडपसर : सोलापूर रस्त्यावरील बीआरटी मार्गावर पीएमपीएलच्यावतीने वाहन चालकांवर करण्यात येत असलेल्या दंडात्मक कारवाई विरोधात व सदोष बीआरटी विरोधात नागरिकांच्या सह्यांची मोहिम सुरू आहे. या मार्गावरील सदोष बीआरटी बंद करावी, अशी मागणी या मोहिमेत करण्यात येत आहे. सावली फांउडेशनच्यावतीने ही मोहिम घेण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी पंधराशे नागरिकांनी सह्या करून या मोहिमेत सहभाग नोंदविला. 

फांउडेशनचे अध्यक्ष व नगरसेवक योगेश ससाणे म्हणाले, बीआरटी सदोष आहे. खासगी लेनमध्ये वाहनांच्या मोठया रांगा लागत आहेत. बीआरटीच्या मार्गालगत खासगी वाहनांसाठी लेन वाढविण्याची आवश्यकता आहे. सध्या खासगी वाहनांना रस्ता अपुरा पडत असल्याने वाहतूक कोंडी, प्रदूषण व वाहनांच्या लांब रांगा लागत आहेत. या मार्गावर पून्हा महापालिकेने सुधारणांच्या नावाखाली बजेट टाकले आहे. नागरिकांना बफर झोन मधून रस्ता ओलांडण्यासाठी महापालिकेने नियोजन केले असले, तरी हा धोकादायक बफर झोन तयार करू नये. बीआरटीच्या मधोमध बस स्टॉप करू नये. त्याला आमचा विरोध आहे. प्रभाग समितीमध्ये पालिका अधिकाऱ्यांनी बीआरटी मार्गात करण्यात येत असलेल्या सुधारणांबाबत जे प्रेझेंटेशन दाखवले आहे, त्यात दोष असल्याने नगरसेवकांनी त्याला विरोध केला आहे.

Web Title: Marathi news pune news oppose to BRT