संत तुकाराम महाराज पालखी तळाची पथकाकडून पाहणी 

विजय मोरे
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

उंडवडी (पुणे) : उंडवडी सुपे ( ता. बारामती) येथील श्री. संत तुकाराम महाराज पालखी तळाला श्री. संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष विश्वस्त व अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. या पथकात उपायुक्त (भूसंपादन) जयंत पिंपळगावकर, विशेष कार्य अधिकारी उत्तम चव्हाण, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, श्री. संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. बाळासाहेब मोरे, विश्वस्त ह. भ. प. सुनील मोरे, जालिंदर मोरे, विठठल मोरे, नितीन मोरे  सहभागी होते.

श्री. संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील देहू ते पंढरपुर या मार्गावरील गावांना व पालखी तळाला पथकाने पाहणी दौरा सुरु केला आहे. या पथकाने नुकतीच उंडवडी सुपे येथील पालखी तळ परिसराची व नियोजित जागेची पाहणी केली. तसेच खराडेवाडी हददीतील गुंजखिळा येथील नियोजित जागेचीही पाहणी केली.

यावेळी बारामतीचे प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार हनुमंत पाटील,  बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता विश्‍वास ओव्हाळ, भूमी अभिलेख विभागाचे उपअधिक्षक शिवप्रसाद गौरकर, उंडवडी कपचे मंडल अधिकारी एम. पी. सय्यद, उंडवडी सुपेचे सरपंच एकनाथ जगताप, उपसरपंच पोपट गवळी, माजी उपसरपंच भरत जगताप  खराडेवाडीचे सरपंच दत्तात्रय खराडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

शासनाच्या वतीने पालखी मुक्कामी पालखी तळ परिसराचा दोन कोटींचा कृती विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पालखी तळ व नियोजित जागेची अंतिम पाहणी पथकामार्फत सुरु आहे. तसेच श्री. संत तुकाराममहाराज पालखी महामार्गाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. 

श्री. संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील देहू ते पंढरपुर या मार्गावरील गावांना व पालखी तळाला पथकाने भेट व  पाहणी दौरा सुरु केला आहे. या पथकाने नुकतीच वारीच्या वाटेवरील उंडवडी सुपे येथील पालखी तळ परिसराची व नियोजित जागेची पाहणी केली. तसेच खराडेवाडी हददीतील गुंजखिळा येथील नियोजित जागेचीही पाहणी केली. यावेळी पथकाने खराडेवाडी व उंडवडी सुपे येथील नियोजित जागेची स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थांकडून माहिती घेतली. 

Web Title: Marathi news pune news palakhital inspection officers