लोकशाही बळकटीसाठी सर्वांनी कायद्याचे पालन करणे गरजेचे

संतोष आटोळे
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

सिध्देश्वर निंबोडी (ता.बारामती) येथे जातीय सलोखा व शांतता कमिटी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गौड बोलत होते.यावेळी पोलिस हवालदार आर.व्ही.शेंडगे, बीट अंमलदार मारुती हिरवे, भानुदास बंडगर, युवराज चव्हाण, उपसरपंच नितीन विधाते, माजी सरपंच किशोर फडतरे, संतोष सोनवणे, संपत सवाणे, पोपट खडके, राजेंद्र सवाणे, संतोष नगरे, पोलिस पाटील धायतोंडे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

शिर्सुफळ : जगात आदर्श असलेली भारतीय लोकशाही बळकटीकरणासाठी सर्वांनी कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे.तसेच तरुणांनी व्यसने व भांडणतंटे पासुन दुर राहत आदर्श समाज, गाव घडविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.असे प्रतिपादन बारामती तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक एस.आर.गौड यांनी केले.

सिध्देश्वर निंबोडी (ता.बारामती) येथे जातीय सलोखा व शांतता कमिटी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गौड बोलत होते.यावेळी पोलिस हवालदार आर.व्ही.शेंडगे, बीट अंमलदार मारुती हिरवे, भानुदास बंडगर, युवराज चव्हाण, उपसरपंच नितीन विधाते, माजी सरपंच किशोर फडतरे, संतोष सोनवणे, संपत सवाणे, पोपट खडके, राजेंद्र सवाणे, संतोष नगरे, पोलिस पाटील धायतोंडे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना गौड पुढे म्हणाले, समाजात वावरत असताना सर्वांनी सर्व धर्माचा आदर करावा.भारतीय राज्यघटनेने व्यक्ती कोणत्याही जाती धर्माची असो सर्वांना समान अधिकार प्रदान केलेले आहेत. तसेच प्रत्येक गावांमध्ये गटतट असतात मात्र ते फक्त निवडणुकांपुरतेच मर्यादित ठेवावेत.निवडणुका झाल्यानंतर सर्वांनी एकत्र येत गाव शांतता व  विकासाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. यावेळी संतोष सोनवणे यांनी गावातील तंटामुक्त समिती व ग्राम सुरक्षा दल सक्षम करण्यासाठी पोलिस प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी केली. तर उपस्थित तरुणांनी कोणताही गुन्हा दाखल करण्यापूर्वी शहनिषा करण्याची मागणी केली.सर्व उपस्थितांचे आभार संपत सवाणे यांनी मानले. 

Web Title: Marathi news Pune news PI SR Gaud statement