तीन सराईतांकडून साडेतीन लाखांचा ऐवज जप्त

रवींद्र जगधने 
मंगळवार, 23 जानेवारी 2018

निगडी पोलिसांनी अटक केलेल्या तीन सराईत गुन्हेगारांकडून सात मोबाईल, सोन्याचे दागिने व दोन दुचाकी असा एकूण तीन लाख 52 हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

पिंपरी : निगडी पोलिसांनी अटक केलेल्या तीन सराईत गुन्हेगारांकडून सात मोबाईल, सोन्याचे दागिने व दोन दुचाकी असा एकूण तीन लाख 52 हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

आनंद त्र्यंबक इंदुकाने (वय 21, रा. सेक्‍टर नं. 27/359, निगडी प्राधिकरण), ऋषिकेश चांदुप्रसाद काटे (वय 20, रा. सेक्‍टर नं. 24/164, भेळचौक, निगडी, मूळ रा. धारडी गोळ, ता. सोनपेठ, जि. परभणी) आणि अतुल सोमनाथ काटे (वय 20, रा. वाल्हेकरवाडी, मूळ रा. धारडी गोळ, ता. सोनपेठ, जि. परभणी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस कर्मचारी प्रकाश काळंगे, कबीर पिंजारी, बाळासाहेब शेलार यांनी निगडीतील कॅम्प एज्युकेशन कॉलेज येथून तिघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्‍या दाखवताच त्यांनी पायी चालणाऱ्या महिलेची पर्स व व्यक्तीचा मोबाईल हिसका मारून चोरल्याची कबुली दिली. 

पोलिसांनी त्यांच्याकडून 71 हजार किमतीचे सात मोबाईल, एक लाख 62 हजार किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व नेकलेस, एक लाख 10 हजार किमतीच्या दोन दुचाकी, तसेच दोन हजार 300 रुपयांची रोकड हस्तगत केली.

सदर कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार पळसुले, निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, तात्या तापकीर, प्रकाश काळंगे, कबीर पिंजारी, बाळासाहेब शेलार, आनंद चव्हाण, मच्छिंद्र घनवट, स्वामिनाथ जाधव, रमेश मावसकर, किरण खेडकर, किशोर पढेर यांनी केली.

Web Title: Marathi News Pune news Pimpri News Crime news 3 lakh forfeited