पुणे - पिंपरीतील घरकुल परिसरामध्ये तीन वाहनांची तोडफोड 

संदीप घिसे 
मंगळवार, 13 मार्च 2018

पिंपरी (पुणे) : दोन दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी तीन वाहनांची तोडफोड केली ही घटना चिखलीतील घरकुल परिसरामध्ये मंगळवारी (ता. १३) पहाटे घडली. 

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटे पावणे दोन वाजताच्या सुमारास दोन दुचाकीवरून पाच जण घरकुल परिसरात आले. त्यांनी एक टेम्पो व दोन मोटारींची तोडफोड केली.

याबाबत बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड म्हणाले "ठराविक वाहनांना तोडफोडीमध्ये लक्ष करण्यात आल्याने वैयक्तिक वादातून ही घटना घडली असावी." गेल्या काही दिवसांमध्ये घरकुल आणि शहराच्या विविध भागांमध्ये वाहनांच्या तोडफोडीच्य घटना घडत आहेत यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Marathi news pune news pimpri vehicle destroys