कटफळ येथे फेरेरो कंपनीकडून 400 झाडे भेट 

संतोष आटोळे
मंगळवार, 30 जानेवारी 2018

कटफळ (ता. बारामती) : येथील ग्रामपंचायतीला बारामती एमआयडीसीतील अग्रगण्य कंपनी इनसोफर फेरेरो यांच्याकडून सीएसआर निधीतून विविध प्रकारच्या झाडांची 400 रोपे भेट देण्यात आली. कंपनीचे मुख्य अधिकारी इंदर चोप्रा यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. चला आदर्श गाव घडवूया या अंतर्गत येथील गावच्या हद्दीतील रस्त्याच्या कडेला पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल विचारात घेता ग्रामपंचायतीमार्फत 2600 झाडे यापूर्वी लावण्यात आलेली आहेत. 

या झाडांसाठी रोजगार हमी योजनेंतर्गत 13 महिला मजूर काम करीत आहेत. त्यामुळे झाडांचे संरक्षण चांगल्या पद्धतीने होत आहे. तसेच उर्वरित ठिकाणी वृक्षारोपणासाठी ग्रामपंचायतीने इनसोफर फेरेरो कंपनीकडे झाडांची मागणी केलेली होती. त्यानुरुप झाडांची रोपे कंपनीतर्फे देण्यात आली. याप्रसंगी कंपनीचे मुख्य अधिकारी इंदर चोप्रा यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. याप्रसंगी कंपनीचे उमेश दुगाणी, प्रशांत कुलकर्णी, सरपंच सारिका भारत मोकाशी, उपसरपंच शरद कांबळे, कांतीलाल माकर, मुकिंद मदने, कस्तुरा कांबळे, भारत मोकाशी, विश्वास मोकाशी, संग्राम मोकाशी, नशीर तांबोळी, सागर आटोळे व ग्रामसेवक सतिश बोरावके यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Marathi news pune news plant gifted by insofar ferrero