प्लान्ट टिशू कल्चर कार्यशाळेचा समारोप

Plant-Tissue-Workshop
Plant-Tissue-Workshop

हडपसर : आयुष्यात अनेक संकटे येतात. हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्याने कोलमडून जाऊ नका. यशस्वी होण्यासाठी कौशल्यपूर्ण शिक्षणाचा ध्यास घ्या. टिशू कल्चर सारखा कोर्स नाविन्यपूर्ण कोर्स आहे. वनस्पतीची कृत्रिम पद्धतीने होणारी वाढ, मातीविना वनस्पस्तीची निर्मिती करणे, कुठल्याही प्रकारचे अनुकूल वातावरण नसताना वनस्पतींपासून उत्पादन घेणे. या गोष्टी यातून शिकण्यासारख्या आहेत. त्या वनस्पतीचा फायदा शेतकरी, समाज, यांना होणार आहे. त्यासाठीची जनजागृतीची आवश्यकता आहे, असे मत प्रा. डॉ. संतोष गोपाळे यांनी व्यक्त केले.

रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम जोशी महाविदयालयांमध्ये वनस्पतीशास्त्र विभागाच्यावतीने प्लॅन्ट टिशू कल्चर कार्यशाळेचे 15 दिवस आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॅा. गोपाळे बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य अरविंद बुरुंगले, उपप्राचार्य डॉ. अशोक धुमाळ, डॉ अशोक धामणे, विभाग प्रमुख डॉ. शिल्पा शितोळे, डॉ. हेमलता करकर, डॉ. दत्तात्रय हिंगणे , डॉ. शाम मिसाळ, प्रा. संजय जडे, डॉ अशोक पंढरबाळे, प्रा. सुप्रिया नवले, डॉ. मनीषा सांगळे, प्रा. सायली गायकवाड, प्रा. ऋषिकेश खोडदे, प्रा. आनंद हिप्परकर, डॉ. मनीषा सांगळे उपस्थित होते.

 डॅा. बुरुंगले, म्हणाले की पारंपरिक शिक्षण बरोबर कौशल्यपूर्ण शिक्षण देण्याची गरज ओळखून टिशू कल्चर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मातीविना रोप कसे तयार करता येते. त्याचे महत्व व फायदे प्रत्यक्ष मुलांना कृतीतून शिकता यावे. शेतकऱ्याला त्याचा फायदा व्हावा व विद्यार्थ्यांनी वेगळा व्यवसाय करावा, हा उद्देश ठेऊन तशा प्रकारची सुविधा विध्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. पंधरा दिवसात विद्यार्थ्यांनी रोप निर्मितीचा अनुभव प्रकट करून आत्मविश्वास व कौशल्य प्राप्ती झाल्याचे सांगितले. तसेच त्या विद्यार्थांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला, तसेच विविध महाविद्यालायीन विद्यार्थ्यांनी येथील टिशू कल्चर कार्यशाळेस भेट देऊन रोप निर्मितीचे संशोधन केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com