प्लास्टिकमुक्त सांगवीसाठी संघटित प्रयत्न करू: हर्षल ढोरे

रमेश मोरे
बुधवार, 21 मार्च 2018

जुनी सांगवी - प्लास्टिक कचऱ्याचे दुष्परिणाम रोखण्यासाठी केलेल्या कायद्याची अंमलबजावणी विक्रेते व नागरीकांनी करावी. तसेच पर्यावरण व आपला परिसर  स्वच्छ ठेवण्यासाठी संघटीत प्रयत्न करण्याचे आवाहन नगरसेवक हर्षल ढोरे यांनी सांगवी येथील भाजी व्यवसाईक,दुकानदारांना केले. त्याला प्रतिसाद देत जुनी सांगवी परिसरात गुढीपाडव्यापासुन ही मोहिम कठोरपणे राबविण्यात भाजी विक्रेते सरसावले आहेत. भाजी विक्रेत्यांनी हातगाडीवर प्लँस्टीक बंदीचे फलक लावुन नागरीकांनी कापडी पिशवीचा वापर करावा याबाबत जनजागृती सुरू केली आहे.

प्लास्टिक कचऱ्याची समस्या ही मोठे आव्हान ठरल्याची दखल घेत आगामी पिढ्यांच्या भल्यासाठी प्लॅस्टिकबंदी मोहीम कठोरपणे राबविण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून, गुढी पाडव्यापासून प्लॅस्टिकबंदी लागू झाली आहे. परिसरातील दुकानदार, स्वीटहोम चालक, भाजी विक्रेते आदींनी बहुतांश ठिकाणी प्लॅस्टिक बॅग ठेवणे बंद केले आहे.

Web Title: marathi news pune news plastic bags harshal dhere