सिंहगडावर गोळा केल्या 25 हजार प्लॅस्टिक बाटल्या

राजेंद्रकृष्ण कापसे 
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

आमच्या संस्थेचे या अभियानाचे दुसरे वर्ष आहे. या अभियानात आमच्या परिवाराचे आणि सावरकर मंडळ निसर्ग मित्र विभाग, एचआर व्हायब्रन्ट, श्रीबालाजी एंटरप्रायझेस, मराठवाडा युवा मंच, सेराॅक, तुकडोजी महाराज भजनी मंडळ अशा 550 जणांनी सहभाग घेतला.

खडकवासला (पुणे) : वृक्षवल्ली परिवाराकडून आज  (ता. 4) सिंहगड प्लॅस्टिक मुक्त अभियान राबविण्यात आले. यावेळी सुमारे 25 हजार प्लॅस्टिक बाटल्या गोळा करण्यात आल्या आहेत. असा दावा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. 

Plastic Waste

आमच्या संस्थेचे या अभियानाचे दुसरे वर्ष आहे. या अभियानात आमच्या परिवाराचे आणि सावरकर मंडळ निसर्ग मित्र विभाग, एचआर व्हायब्रन्ट, श्रीबालाजी एंटरप्रायझेस, मराठवाडा युवा मंच, सेराॅक, तुकडोजी महाराज भजनी मंडळ अशा 550 जणांनी सहभाग घेतला.

गडावरील ग्रुपकडून सुमारे 15 बाटल्या गोळा करण्यात आल्या. पायवाटेने गडावर जाणाऱ्या रस्ता आणि परिसरात सुमारे 10 हजार बाटल्या गोळा झाल्या आहेत. 
कड्या कपाऱ्यात, रस्त्याला पायवाटेला, हॉटेलच्या मागेपुढे, पाण्याच्या टाक्यामध्ये, ऐतिहासिक वास्तूंच्या झाडाझुडपात जाऊन या बाटल्या गोळा केल्या. या बाटल्या जंगलात तशाच पडून राहिल्यातर त्यांचा प्राणी, किटकांपासून झाडे झुडपं यांना त्रास होणार आहे. पर्यावरणाला हानिकारक आहेत.

या बाटल्या पर्यटकांनी पाणी किंवा थंड पेये पिण्यासाठी खरेदी केलेल्या या बाटल्या आहेत. पाणी थंड पेये पिऊन झाल्यानंतर त्या या जंगलात टाकून दिल्या होत्या. जंगलात प्लॅस्टिकचे प्रदूषण होते. म्हणून या बाटल्या गोळा केल्या आहेत. यातील अनेक पदाधिकरी गुरुवार, रविवारी सिंहगडावर येत असतात. त्यावेळी देखील आम्ही बाटल्या गोळा करीत असतो. असे या परिवाराचे ऋषिकेश पाटील, प्रीतम गंजेवार, भगवान भोसले, सुधीर लांडगे, संतोष नाईक, संजय चाटे यांनी सांगितले. 

Web Title: Marathi news pune news plastic waste collection sinhagad fort