कामावरून काढल्याने पीएमपी कर्मचाऱ्याची आत्महत्या

संदीप घिसे 
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

तुकाराम निवृती मुंडकर (वय ४२, रा. हनुमान कॉलनी नं.६, चक्रपाणी रोड, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पिंपरी : दोन महिन्यांपूर्वी कामावरून काढल्यामुळे बेकारीला कंटाळून पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. ही घटना भोसरी येथे मंगळवारी रात्री घडली.

तुकाराम निवृती मुंडकर (वय ४२, रा. हनुमान कॉलनी नं.६, चक्रपाणी रोड, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. भोसरी पोलिस ठाण्यातील हवालदार मोहन डबीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकाराम यांच्या पत्नी रात्री दहाच्या सुमारास आपल्या बहिणी गेल्या होत्या. त्यावेळी तुकाराम यांनी छताच्या पंख्याला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री ११.०० वाजता पत्नी घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

तुकाराम हे पीएमपीएमएल मध्ये चालक म्हणून कामाला होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांना कामावरून काढून टाकले होते. तेव्हापासून ते घरीच होते. बेकारीला कंटाळून आलेल्या नेराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितले.

Web Title: Marathi news Pune news PMP employee suicide