हडपसर येथे पीएमपीएल बसला आग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जानेवारी 2018

डीपी रस्ता येथील खासगी पीएमपीएमएल बस पार्किंगमध्ये एका पीएमपी सीएनजी बस जळून खाक झाली. या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. पीएमपीएमएलसाठी भाडेतत्वावर दिल्या जाणाऱ्या महालक्ष्मी ट्रान्सपोर्टच्या गाडया याठिकाणी पार्क केल्या जातात. तेथे ५० बसेस पार्किंग केल्या. त्यातील एका बसने अचानक पेट घेतला.

हडपसर : डीपी रस्ता येथील खासगी पीएमपीएमएल बस पार्किंगमध्ये एका पीएमपी सीएनजी बस जळून खाक झाली. या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. पीएमपीएमएलसाठी भाडेतत्वावर दिल्या जाणाऱ्या महालक्ष्मी ट्रान्सपोर्टच्या गाडया याठिकाणी पार्क केल्या जातात. तेथे ५० बसेस पार्किंग केल्या. त्यातील एका बसने अचानक पेट घेतला. हडपसर अग्निशामक केंद्राचा बंब तातडीने घटनास्थळी पोहचला. 

मात्र, तोपर्यंत बस जळून खाक झाली होती. आग विझविल्याने सीएनजी भरलेली टाकी वाचविण्यात कर्मचाऱ्यांना यश आले. सीएनजी टाकीचा स्फोट झाला असता तर शेजारी पार्क केलेल्या बसेसना धोका पोहचला असता. मात्र, अग्निशामक केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. 

हडपसर अग्निशामक केंद्राचे अधिकारी शिवाजी चव्हाण, कर्मचारी चंद्रकांत जगताप, सखाराम पवार, दत्तात्रय चौधरी, बाबासाहेब चव्हाण यांनी घटनास्थळी पोहचून अवघ्या पाच मिनिटांमध्ये आगीवर ताबा मिळवत आग पूर्णपणे विझवण्यात आली.

Web Title: Marathi News Pune News PMPML BUS Burn