सांगवीत पोलिस आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

रमेश मोरे
मंगळवार, 30 जानेवारी 2018

जुनी सांगवी : समाजासाठी दिवस रात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस बांधवांसाठी येथील शिवस्वामी संघाच्या वतीने सांगवी पोलिस ठाण्यात पोलिसांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात ह्रदयरोग तपासणी, मधुमेह, दैनंदिन आरोग्य व घ्यावयाची काळजी, वजन नियंत्रित ठेवणे इत्यादी विषयावर तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले.

सांगवी येथील आदित्य वेलनेस सेंटर व हार्डीकर हॉस्पिटल यांच्या सौजन्याने मोफत आरोग्य शिबिरात 130 पोलिस कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अजय चांदखेडे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी प्रसाद गोकुळे, आदीत्य वेलनेस सेंटरचे विशाल खेडेकर, कल्पना कार्ले शिवस्वामी संघाचे  संतोष काकडे, पराग ढोरे, जितेंद्र सातव, उमेश पवार, प्रतिक ढोरे, शंभु ढोरे आदी उपस्थित होते.

Web Title: Marathi news pune news police health check up camp