पुणे: कोथरुडमधील हुक्का पार्लरवर कारवाई 

जितेंद्र मैड
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

नागरी सुरक्षा समितीचे संदिप कुंबरे म्हणाले की, 24 जानेवारी रोजी येथे लेडीज डान्स नाईट होत आहे याची खबर पोलिसांना दिली होती. पण त्याची म्हणावी तशी दखल घेतली नाही.  जवळच पोलीस स्टेशन असलेल्या भागात अशा घटना घडत असतील तर गुन्हेगारांवर वचक तरी कसा बसेल.

पुणे : कोथरूड डेपो येथील राॅयल बाबाज गार्डन या ठिकाणी चालणाऱ्या अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. 

प्रेझेंटिंग नेऑन नाईट या नावाने सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या पोस्टची दखल घेऊन न्यूज पोर्टल चालविणाऱ्या काही पत्रकारांनी पहाटे अडीच वाजता स्ट्रींग ऑपरेशन केले. सर्फराज अजगरअली अन्सारी, दुरानी काॅम्लेक्स, सी वांगी, कोंढवा व एजाझ काझी यांच्यावर कोपटा (तंबाखू जन्य पदार्थ कायदा), कलम 133, आरडब्लू , 135 ग, छ नुसार गुन्हा दाखल केल्याचे पोलीस उपनिरीक्षक शाम शिर्के यांनी सांगितले.

पत्रकारांनी पोलिसांना फोन करूनही पोलिस येत नसल्याने त्यांनी सकाळ प्रतिनिधीशी संपर्क साधला. सकाळ प्रतिनिधीने पोलिस निरीक्षक शंकर खटके यांना दूरध्वनी करून संबंधित घटनेची माहिती दिली. त्यांच्या फोन नंतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. 

सागर बोदगिरे यांनी सांगितले की, पोलीस येईपर्यंत  बरचशे तरूण तरूणी पळून जाण्यात यशस्वी झाले. तेथील पंधरा कर्मचार्‍यांनी हुक्का. मादक पदार्थ यांची विल्हेवाट लावली होती. आम्ही   पत्रकारांनी रितसर पंचनामा करण्याचा आग्रह धरल्याने पोलिसांनी या अवैध हाॅटेल व हुक्का पार्लरची पाहणी केली.  हुक्का पिणा-या आठ तरूणांची नावे लिहून घेतली. या  हाॅटेलचे प्रवेश व्दार अरुंद असून अंधार असतो. त्यातून आत गेल्यावर   मोकळ्या जागेत  दर्शनी भागाला चहा व स्नॅक्सची टपरी आहे.  मुख्य इमारतीच्या आता प्रवेश केला की उजव्या बाजूला डान्स बार आहे. डाव्या बाजूला जीन्याने वर गेले की  हुक्का बार व इतर गैरप्रकार  करण्याची जागा आहे.  एका तळ खोलीत भटारखाना व वर बांधलेल्या   शेड मध्ये काही  रूम तयार करण्यात आले आहेत. तेथे गाद्या, सोफा, हुक्का साहित्य होते. 

नागरी सुरक्षा समितीचे संदिप कुंबरे म्हणाले की, 24 जानेवारी रोजी येथे लेडीज डान्स नाईट होत आहे याची खबर पोलिसांना दिली होती. पण त्याची म्हणावी तशी दखल घेतली नाही.  जवळच पोलीस स्टेशन असलेल्या भागात अशा घटना घडत असतील तर गुन्हेगारांवर वचक तरी कसा बसेल.

वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे कार्यालय कोथरुडमध्ये झाल्यामुळे या भागातील अवैध प्रकार बंद पडतील व गुन्हेगारीला आळा बसेल अशी नागरिकांची अपेक्षा आहे. येथील हुक्का पार्लर व आदी गैरप्रकार करणारांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी ऑल इंडिया जर्नालीस्ट असोसिएशनच्या पत्रकारांनी केली.

Web Title: Marathi news Pune news police raid hookah parlour