पोलिस भरतीची प्रक्रिया आजपासून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

पुणे - शहर पोलिस भरती प्रक्रिया सोमवारपासून (ता.१२) होणार आहे. पोलिस शिपाई पदाच्या २१३ जागांसाठी तब्बल ४९ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. याबरोबरच ग्रामीण पोलिस भरतीची प्रक्रियाही होणार आहे. 

पुणे - शहर पोलिस भरती प्रक्रिया सोमवारपासून (ता.१२) होणार आहे. पोलिस शिपाई पदाच्या २१३ जागांसाठी तब्बल ४९ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. याबरोबरच ग्रामीण पोलिस भरतीची प्रक्रियाही होणार आहे. 

पोलिस आयुक्तालयातर्फे ७ मार्चपासून भरती प्रक्रिया सुरू होणार होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. त्यानुसार सोमवारपासून शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात शहर पोलिस भरती प्रक्रिया होणार आहे. त्यामध्ये शारीरिक मोजमाप, मैदानी चाचणी होणार आहे. आठ हजार महिला, तीन हजार बॅंडपथकासाठीचे उमेदवार; तर उर्वरित ३८ हजार पुरुष उमेदवार भरती प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. ४९ हजारांपैकी ४५ हजार उमेदवार भरतीसाठी येण्याची शक्‍यता आहे. भरती प्रक्रियेसाठी अतिरिक्त पोलिस आयुक्त, तीन उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त, आठ पोलिस निरीक्षक आणि सहाशे पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी राहणार आहेत.

Web Title: marathi news pune news police recruitment