आरक्षित तिकिट असूनही पोलिसांनी रेल्वेतून उतरविले

police
police

येरवडा : झारखंड येथे मूळ रहिवासी असलेला युवक पुणे रेल्वे स्थानकावरून बुधवारी सकाळी दुरांतो एक्सप्रेसने भावी वधूला पाहण्यासाठी निघाला. आरक्षण तिकिट असल्यामुळे तो आपल्या बर्थवर मोबाईलमधील गाणी ऐकत होता. त्याचवेळी रेल्वेचे पोलिसांनी त्याला तुझ्या मोबाईलमध्ये अश्‍लिल चित्रफित असल्याचे सांगून त्याच्याकडून पंधरा हजार रुपयांची मागणी केली. त्याने नकार देतातच चिडलेल्या पोलिसांनी त्याच्या खिशातील तीन हजार रुपये घेऊन त्याला गाडीतून खाली उतरविले. 

दिनेश (नाव बदलले आहे) नगर रस्त्यावरील एका मल्टीप्लेक्समध्ये काम करतो. तो बुधवारी रेल्वेने झारखंडला मुलगी पाहण्यासाठी निघाला होता. त्यासाठी त्याने एक महिन्यापूर्वीच रेल्वेचे आरक्षण केले होते. तो रेल्वेमधील बर्थवर मोबाईलमधील गाणी ऐकत बसला होता. त्याचवेळी गाडीत आलेल्या रेल्वेच्या तीन पोलिसांनी त्याला तू अश्‍लिल (प्रोन) फिल्म पाहतो म्हणून दम दिला. दिनेशने मोबाईलमध्ये असे फिल्म नसल्याचे सांगितले. त्यावर पोलिसांनी त्याच्याकडे पंधरा हजार रुपयांची मागणी केली. दिनेशने आपल्याकडे केवळ तीन हजार रुपये असून लांबचा प्रवास असून घरी जात असल्याचे सांगितले. यावर चिडलेल्या पोलिसांनी त्याच्या खिशातील तीन हजार रुपये घेऊन त्याला चौकशी करायची आहे म्हणून रेल्वेतून खाली उतरविले. 

दिनेश रेल्वे पोलिसांसोबत खाली उतरला. त्यांना तो सोडून देण्याची विनवणी करु लागला मात्र दुरांतो एक्सप्रेसने कधी फलाट सोडला हे त्याला कळलेच नाही. गावाकडे जाणारी रेल्वेगाडीही गेली आणि खिशातील तीन हजार रुपये सुद्धा गेले. दरम्यान पोलिस दुसरे सावज हेरण्यासाठी दुसऱ्या फलाटावर निघून गेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com