किल्ले बनवा व चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ अजित पवारांच्या हस्ते

संदिप जगदाळे
सोमवार, 15 जानेवारी 2018

हडपसर : सावली फाऊंडेशनतर्फे घेण्यात येत असलेल्या किल्ले बनवा स्पर्धा म्हण्जे शिवरायांचा जागर असून या माध्यमातून शिवरायांच्या काळातील स्मृतींना उजाळा मिळत आहे. तसेच त्यांचे कार्य व इतिहास चिमुकल्यांना समजण्यास मदत होत आहे, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

हडपसर : सावली फाऊंडेशनतर्फे घेण्यात येत असलेल्या किल्ले बनवा स्पर्धा म्हण्जे शिवरायांचा जागर असून या माध्यमातून शिवरायांच्या काळातील स्मृतींना उजाळा मिळत आहे. तसेच त्यांचे कार्य व इतिहास चिमुकल्यांना समजण्यास मदत होत आहे, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

सावली फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या किल्ले बनवा व चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून पवार बोलत होते. याप्रसंगी विरोधी पक्षनेते चेतन तुपे, राष्ट्रवादी पक्षाच्या महिला शहर अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी आमदार जग्गनाथ शेवाळे, सावली फांऊडेशनचे अध्यक्ष व नगरसेवक योगेश ससाणे, माजी महापौर वैशाली बनकर, राजलक्ष्मी भोसले, माजी उपमहापौर बंडू गायकवाड, निलेश मगर, नगरसेविका रत्नप्रभा जगताप, हेमलता मगर, उज्वला जंगले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदिप कंद, माजी नगरसेवक दत्तोबा ससाणे, सुनिल बनकर, रईस सुंडके, सागरराजे भोसले, विजय मोरे, अतुल तरवडे, अजिंक्य घुले, विक्रम शेवाळे, दिलीप गायकवाड उपस्थित होते. 

पवार पुढे म्हणाले, सावली फांउडेशनच्या माध्यमातून महिलांना रोजगार व स्वयंरोजगार आणि स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देवून महिलांचा सर्वांगिण विकास केला जात आहे. तसेच चित्रकला व किल्ले बनवा स्पर्धेच्या माध्यमातून मुलांमधील सुप्त कला गुणांना संधी दिली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व नगरसेवकांनी या फाऊंडेशनचा आर्दश डोळ्यासमोर ठेवून विधायक व सामाजिक कामे करायला हवीत. 

सावली फाऊंडेशनचे अध्यक्ष म्हणाले, किल्ले बनवा स्पर्धेचे सहावे तर चित्रकला स्पर्धेचे हे चौथे वर्षे आहे. या दिवाळीत मुलांनी १४०० किल्ले बनविले. तर सहा हजाराहून अधिक विदयार्थ्यांनी चित्रकला स्पधेत सहभाग घेतला. सावली प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेतलेल्या हजारो महिला आर्थिकदृष्टया स्वावलंबी झाल्या आहेत. त्यामुळे त्या स्वाभिमानाने व अत्मविश्वासाने जीवन जगत आहेत. 

Web Title: Marathi news pune news prize distribution by ajit pawar