पुणे - जुन्या कचरा गाड्यांचे रडगाणे कायमच

रमेश मोरे  
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी प्रभाग क्र. 32 मधील कचरा व्यवस्थापन व स्वच्छता कामात काही अंशी सुधारणा झाल्याचे समाधानकारक चित्र सध्या परिसरात पहावयास मिळत आहे.

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी प्रभाग क्र. 32 मधील कचरा व्यवस्थापन व स्वच्छता कामात काही अंशी सुधारणा झाल्याचे समाधानकारक चित्र सध्या परिसरात पहावयास मिळत आहे.

मोक्याच्या ठिकाणी ओसंडुन वहाणाऱ्या कचराकुंड्या, नागरीकांनी रस्त्यावरच कचरा फेकल्याने अस्ताव्यस्त पडलेला कचरा यामुळे सांगवीची कचरा समस्या मागील काही काळात बिकट झाली होती. या प्रभागांतर्गत पूर्वी 27 सफाई कर्मचारी काम करत होते. यातच महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नव्याने ठेका दिलेल्या ठेकेदार आधिक पालिकेचे कायम कामगार संख्या 45 झाल्याने प्रभागातील सफाई स्वच्छता कामात सध्यातरी सुधारणा झाल्याचे चित्र प्रभागात पहावयास मिळत आहे. येथील मोक्याच्या ठिकाणी मुळा नदी स्पायसर रस्ता पुलावर याआधी रोज कचऱ्याचा ढीग लागायचा. आधीच अरूंद असणाऱ्या रस्त्यावर नागरीकांनी फेकलेल्या कचऱ्यातुन भल्या सकाळी वाहानचालकांना मार्ग काढावा लागत असे तर पदपथावरील कचर्याच्या ढीगामुळे पदपथावरून पायी चालणे जिकिरीचे व्हायचे.

आरोग्य विभागाच्या सफाई कामगारांना येथील कचरा रोज हाताने भरून विल्हेवाट लावावी लागत होती. यावेळी येथे वहातुक कोंडीही व्हायची. स्थानिक प्रशासनाकडुन स्वच्छ भारत अभियानांतर्गत येथे खुर्ची बाके बसवुन येथील सुशोभिकरण करण्यात आले आहे. कचरा टाकु नये अशा सुचना लिहिल्या आहेत. तर सकाळी व रात्री अशा सर्व मोक्याच्या ठिकाणी आरोग्य विभागाचे कर्मचारी उभे असतात. काही दिवसांपासुन चाललेल्या या दिनक्रमामुळे येथील परिसर स्वच्छ दिसु लागला आहे. नागरीकांनीही यात सुज्ञपणा दाखवुन स्वच्छतेच्या कामास हातभार लावल्याचे चित्र सध्या प्रभागात पहावयास मिळते. येथील कुंभारवाडा परिसर, पवनानगर घाट या ठिकाणी कचर्याचे ढिग साचले जायचे या दोन्ही ठिकाणी स्थापत्य विभागाकडून भिंत बांधुन सुशोभिकरण करण्यात येत आहे. अरूंद गल्ल्या, रस्त्यावरील पार्कींग यामुळे काही ठिकाणी कचरा गाड्या पोचत नाहीत. परीणामी कचरा तुंबल्याने नागरीकांकडून कचरा उघड्यावर फेकला जातो.

अपुर्या व जुन्या गाड्यांचे रडगाणे कायम
जुनी सांगवी प्रभाग रचनेत नव्याने सामाविष्ट केलेल्या साई चौक व परिसरामुळे सध्या प्रभागात कचरा उचलण्यासाठी सहा ते सात गाड्या कार्यरत आहेत. मात्र त्याही सुस्थितीत नसल्याने कचरा उचलण्याकामी अपुर्या पडतात. गाड्या पंक्चर होणे, बंद पडुन नादुरूस्त होणे यामुळे कचरा व्यवस्थापनावर ताण येतो. परिणामी कचरा रस्त्यावर येतो. नदीकाठावरील रहिवाशांकडुन पात्रालगगत कचरा फेकला जातो. येत्या 1 मार्चच्या प्रस्तावात नविन गाड्यांसह टेंडर आहे. यामुळे प्रभागात नविन गाड्या अपेक्षित आहेत. यामुळे कचरा व्यवस्थापनात मदत होईल. मात्र आत्ताच गाड्यांची संख्या सांगता येणार नाही, असे "ह"प्रभाग आरोग्य अधिकारी ज्ञानेश्वर सासवडकर यांनी सांगितले. 

Web Title: Marathi news pune news problem of public dust bean