उंड्री महापालिकेत जाउन समस्या कमी होईना!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

उंड्रीतील समस्या जैसे थे.....
उंड्री गाव महापालिकेत गेल्यापासून काही तरी सुधारणा होतील अशी नागरिकांना अपेक्षा होती, परंतू महापालिका आल्यापासून या भागात समस्या कमी होण्याऐवजी वाढल्या आहेत. रस्त्यावरील अतिक्रमणे, अनाधिकृत बांधकामे , ड्रेनेजच्या समस्या वाढल्या आहेत. सर्वात गंभीर असा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात महापालिका प्रशासन सपशेल अयशस्वी ठरल्याचे चित्र आहे.

उंड्री : कडनगर उंड्री रस्त्यावर गेल्या दोन महिन्यापासून दोन चेंबर वर झाकण नाही. तर एका चेंबरवरील लोखंडी जाळी मोडकळीस आली आहे. उघड्या चेंबरमध्ये पडून बाइकस्वार, पादचारी जखमी झाल्याच्या घटना वाढत आहे. महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होत असून लवकरात लवकर चेंबरवर झाकणे बसविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

उंड्रीतील समस्या जैसे थे.....
उंड्री गाव महापालिकेत गेल्यापासून काही तरी सुधारणा होतील अशी नागरिकांना अपेक्षा होती, परंतू महापालिका आल्यापासून या भागात समस्या कमी होण्याऐवजी वाढल्या आहेत. रस्त्यावरील अतिक्रमणे, अनाधिकृत बांधकामे , ड्रेनेजच्या समस्या वाढल्या आहेत. सर्वात गंभीर असा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात महापालिका प्रशासन सपशेल अयशस्वी ठरल्याचे चित्र आहे.

पंचायत समीती सदस्य सचिन घुले-पाटील म्हणाले : उंड्री गावाला पिण्याचे पाणी नियमितपणे मिळावे या करिता  समस्येबाबत महपौर आयुक्त, विभागीय आधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले. परंतू कार्यवाही होत नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्वरीत  सोडविला नाही तर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. 

महापालिकेचे विभागीय आधिकारी उधास - यांच्याशी संपर्क साधला असता  -कर्मचार्‍यांना पाठवून त्वरीत झाकण बसविले जाईल असे सांगितलेे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नाबाबत मी आत्ता तरी काही सांगू शकत नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली 

Web Title: Marathi news Pune news problem in Undri