सदगुरू दर्शन स्मरणीका प्रकाशन सोहळा संपन्न

रमेश मोरे
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

पुणे : पिंपळे गुरव येथील स्वस्वरूप शोधक साधक संस्था आयोजित भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खाडे बाबा महाराजांचा प्रेरणादायी अध्यात्मिक जीवन प्रवास, हस्तलिखित लेख, परीपत्रके, साधक अनुभव यांचा एकत्रित लिखाण असलेल्या सद्गुरू दर्शन स्मरणरिका या  लेखक डॉ. जयदीप काळे यांचा लिखित स्वरूपाचा सद्गुरू दर्शन (भाग-१) स्मरणिका प्रकाशन सोहळा खाडेबाबा मठ उत्साहात संपन्न झाला.

या प्रकाशन सोहळ्यास पोपट पवार हिवरे बाजार सरपंच, अॅड. उदय शेळके चेअरमन महानगर को. ऑप बँक लाल बाग, मुंबई, शेखर गायकवाड संचालक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा महाराष्ट्र राज्य भूजल भवन शिवाजी नगर पुणे, अनिल कवडे महानिरीक्षक राज्य नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग पुणे, रंगनाथ नाईकडे वनसंरक्षक अधिकारी तथा सहसंचालक सामाजिक वनीकरण, राजेंद्र भामरे  सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक नियंत्रण विभाग निगडी, शिव शंभू व्याख्याते राजेंद्र येप्रे, नगरसेवक अंबरनाथ कांबळे, राजेंद्र राजापुरे, नगरसेवक रोहित काटे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर सन्माननीय मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. राघव चैतन्य काटे बाबा यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन मुकुंद पांचाळ यांनी केले तर स्वस्वरूप संस्थेचे सेक्रेटरी प्रवीण वाघमारे यांनी आभार मानले.

Web Title: Marathi news pune news publication