पुणे अंधशाळेत विदयार्थ्यांची मोफत हिमोग्लोबिन तपासणी

संदीप जगदाळे
बुधवार, 21 मार्च 2018

हडपसर - इंडीयन रेडक्रॅास सोसायटी व मुकुल माधव फौडेंशन यांच्यातर्फे कोरेगाव पार्क येथील पुणे अंधशाळेतील विदयार्थ्यांची मोफत हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी करण्यात आली. याप्रसंगी डॅा. गोडबोले बोलत होते. 

हडपसर - इंडीयन रेडक्रॅास सोसायटी व मुकुल माधव फौडेंशन यांच्यातर्फे कोरेगाव पार्क येथील पुणे अंधशाळेतील विदयार्थ्यांची मोफत हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी करण्यात आली. याप्रसंगी डॅा. गोडबोले बोलत होते. 

यावेळी बोलताना त्यांनी हिमोग्लोबिनच्या कमतरतेविषयी माहिती दिली. हिमोग्लोबिन हा रक्तातील अतिशय महत्त्वाचा घटक असून, तो लोह आणि प्रथिने यापासून बनलेला असतो. मात्र अनेक शालेय विदयार्थ्यांमध्ये हे प्रमाण कमी असल्याने त्यांना अॅनिमियाच्या होऊ शकतो. त्यासाठी अनेकदा डॉक्टर गोळ्या देतात. मात्र त्याने तात्पुरते हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. पुन्हा हळूहळू हिमोग्लोबिन खाली जाते, अशावेळी तुमच्या सकस आहारातील काही पदार्थ नैसर्गिकरित्या तुमचे हिमोग्लोबिन वाढवतात. त्यामुळे विदयार्थ्यांना पोषक आहार मिळेल यासाठी पालकांनी जागृत राहणे आवश्यक आहे, असे अवाहन डॅा. रविभूषण गोडबोले यांनी केले.

याप्रसंगी पुणे अंधशाळेचे प्रशासकीय अधिकारी कृष्णा शेवाळे, प्राचार्य चंद्रकांत भोसले, विशेष शिक्षक राजाराम जगताप, मनिष जाधव, ओमकार महिमाने, राहूल शेंडे, संतोष धोरे उपस्थित होते. इंडीयन रेडक्रॅास सोसायटीचे विश्वस्त डॅा. विक्रम पाठक, मुकुल माधव फांउडेशनच्या विश्वस्त रितू छाबरिया यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.

Web Title: marathi news pune news pune andh shala blood test