हॉटेल, ढाब्यांवर छापे; तीन लाखांचे मद्य जप्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

लोणी काळभोर : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक व पुणे विभागीय भरारी पथकाने 3 लाख 8 हजार 628 रुपयांची देशी-विदेशी दारू व बिअरचे बॉक्‍स जप्त केले. यामध्ये अवैध मद्यविक्री करणाऱ्या 11 हॉटेल व ढाब्यांच्या चालकांना अटक केली. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अंमलबजावणी व दक्षता संचालक सुनील चव्हाण व पुणे विभागीय उपायुक्त अर्जुन ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

पथकाने शुक्रवारी (ता. 2) पुणे जिल्ह्यातील देहू-आळंदी रस्त्यावरील चिखली, तळवडे, डुडुळगाव, निगडी येथील ट्रान्सपोर्टनगर व आकुर्डीच्या हद्दीमध्ये अवैध दारूविक्री करणाऱ्या 11 हॉटेल व धाब्यांवर कारवाई केली. यामध्ये चिखली येथील हॉटेल शिवशक्तीचे मालक प्रसाद सुरेश भांगरे (वय 25, रा. चिखली), हॉटेल बोल्हाईचे मालक पवन सुबराव चंदनशिव (वय 19, रा. सोने चौक, चिंचवड), हॉटेल टॉवर लाइनचे मालक किरण विठ्ठल शेट्टी (वय 28, रा. पिंपरी, पुणे), तळवडे येथील हॉटेल श्री बीचे मालक दिनेश उत्तम महाजन (वय 42, रा. तळवडे, पुणे), डुडुळगाव येथील हॉटेल मानसीचे मालक गणेश मधुकर तापकीर (वय 37), हॉटेल प्रज्वलचे मालक नवनाथ दिलीप तापकीर (वय 30), हॉटेल श्रीनंदन बाळासाहेब नामेदव तापकीर (वय 57, सर्व रा. डुडुळगाव, पुणे), हॉटेल श्रेयशचे मालक विशाल श्रीधर तापकीर (वय 34, रा. चाऱ्होली बु., पुणे), ट्रान्सपोर्टनगर येथील हॉटेल हवेलीचे मालक छोटुकुमार ठाकूर (वय 23, रा. ट्रान्सपोर्टनगर, निगडी, पुणे), हॉटेल के. के. चे मालक सचिन अमोडकर (वय 34, रा. चिंचवड), आकुर्डी येथील हॉटेल गिरीजाचे व्यवस्थापक नागेश नारायण पुजारी यांना अटक केली. 

उत्पादन शुल्क विभागाच्या राज्य भरारी पथकाचे उपनिरीक्षक एन. आर. मुंजाळ, पी. जी. काळे, कर्मचारी सदा जाधव, प्रताप कदम, विक्रांत कुंभार, सलीम शेख, पुणे विभागीय भरारी पथकाचे उपनिरीक्षक जनार्दन होले, गणेश वाव्हळे, शरद हांडगर, 
संदीप मांडवेकर, अशोक पाटील, एस. बी. हांडगर, एस. एस. पोंधे यांनी भाग घेतला. विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक नंदकुमार जाधव तपास करत आहेत.
 
Web Title: marathi news Pune News Pune Crime Pune Police