सिंहगड, प्रगती आज रद्द; पुणे-लोणावळा लोकलच्या 20 फेऱ्याही रद्द

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

पुणे : पुणे-मुंबईदरम्यान धावणाऱ्या सिंहगड, प्रगती एक्‍स्प्रेस आणि पुणे-कर्जत पॅसेंजर या रेल्वेगाड्या रविवारी रद्द करण्यात आल्या आहेत, तर पुणे-लोणावळा लोकलच्या 20 फेऱ्याही त्या दिवशी रद्द करण्यात आल्या आहेत. 

पुणे : पुणे-मुंबईदरम्यान धावणाऱ्या सिंहगड, प्रगती एक्‍स्प्रेस आणि पुणे-कर्जत पॅसेंजर या रेल्वेगाड्या रविवारी रद्द करण्यात आल्या आहेत, तर पुणे-लोणावळा लोकलच्या 20 फेऱ्याही त्या दिवशी रद्द करण्यात आल्या आहेत. 

पुणे-लोणावळादरम्यान रेल्वे सिग्नलिंगचे काम रविवारी सकाळी साडेअकरा ते सायंकाळी चार वाजून 10 मिनिटांपर्यंत चालणार आहे. त्यामुळे या दरम्यानच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे सिंहगड, प्रगती आणि पुणे-कर्जत पॅसेंजर यांच्या पुणे-मुंबई, मुंबई-पुणे या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच लोणावळा-पुणे या मार्गावरील लोकलच्या सकाळी साडेसहा ते सायंकाळी चार वाजून 38 मिनिटांपर्यंतच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

पुणे-लोणावळा लोकलच्या सकाळी पावणेसहा ते दुपारी तीन वाजून 10 मिनिटांपर्यंतच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यादरम्यान मुंबई-नागरकोईल एक्‍स्प्रेस कामशेत स्थानकावर सुमारे दीड तास थांबविली जाणार आहे, तर मुंबई-हैदराबाद एक्‍स्प्रेस लोणावळा-कामशेतदरम्यान एक तास थांबविण्यात येईल.

हुबळी-लोकमान्य टिळक स्थानक एक्‍स्प्रेस पुणे विभागात सुमारे साडेतीन तास थांबविली जाणार आहे. पुणे-मुंबई डेक्कन क्वीन देहूरोडजवळ सुमारे 20 मिनिटे थांबविण्यात येईल. पुणे-भुसावळ एक्‍स्प्रेस पुण्यावरून दुपारी पावणेबाराला निघते. ही गाडी रविवारी दौंड-मनमाडमार्गे भुसावळला जाणार असल्याचे मध्य रेल्वेने कळविले आहे.

Web Title: marathi news pune news pune lonavala local