पुण्यात चक्राकार वाहतुकीमुळे गैरसोयीची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 मार्च 2018

पुणे : कर्वे रस्त्यावरील मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी आठवले चौकातून चक्राकार वाहतुकीच्या राबविण्यात येणाऱ्या प्रयोगामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना ये-जा करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून द्यावा आणि अवजड वाहनांना या रस्त्यावर बंदी घालावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. 

चक्राकार वाहतुकीच्या निर्णयामुळे गुलमोहर सोसायटी व परिसरातील रहिवाशांना त्रास होण्याची शक्‍यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. याविषयी स्थानिक रहिवासी विलास बेहरे म्हणाले, ''एसएनडीटीजवळील गुलमोहर पथ परिसरात हजारो ज्येष्ठ नागरिक राहतात. त्यांना अगोदरच रस्ता ओलांडणे शक्‍य होत नाही. त्यामध्ये आता चक्राकार वाहतूक सुरू होणार आहे. त्यामुळे रस्त्याच्या मध्यभागी असलेले बॅरिकेड्‌सही काढून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहने सोडली जातील. या परिसरात राहणारे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिलांना रस्ता ओलांडणे अवघड होईल. याबरोबरच आपल्या घरी जाण्यासाठीही मोठा वळसा घालावा लागणार आहे.'' 

परिसरात 25 बंगले, मोठ्या सोसायट्या, शाळा, शैक्षणिक संस्था आहेत. तेथे ये-जा करणाऱ्यांची गैरसोय होईल. ती टाळण्यासाठी योग्य पर्याय द्यावा, बालभारतीचा रस्ता लवकर पूर्ण करावा, चक्राकार वाहतुकीऐवजी कर्वे रस्त्यावर पोलिस कर्मचारी ठेवून टप्प्याटप्प्याने वाहतूक सोडावी, अशी मागणी बेहरे यांनी केली.

Web Title: marathi news Pune News Pune Metro PMRDA