कात्रज जुन्या घाटात रस्ता डांबरीकरण सुरू

यशपाल सोनकांबळे
गुरुवार, 11 जानेवारी 2018

पुणे : कात्रज जुन्या घाटात जाणाऱ्या रस्त्याची खड्ड्यांमुळे झालेली चाळण, तुटलेले संरक्षक कठडे, दरडी कोसळण्याचा धोका अशा विविध समस्यांबाबत 'सकाळ'ने वृत्त दिले होते. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने रस्ता डांबरीकरणासह अन्य अत्यावश्‍यक कामे सुरू केली आहेत. त्यासाठी 31 जानेवारीपर्यंत साताऱ्याकडे जाण्यासाठी 'एकेरी' (वन वे) वाहतुकीचा निर्णय घेतला. तरीही स्थानिक ग्रामस्थ व बाहेरगावाहून जाणाऱ्या जड वाहनांची वाहतूक सुरूच आहे. 

विरुद्ध दिशेने वाहतूक 
मांगडेवाडी ते भिलारेवाडीदरम्यान रस्ता डांबरीकरण व खडी टाकून खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे. दरम्यान, कात्रज चौकातून जड वाहनांसह अन्य वाहनांची वाहतूक सुरू आहे; परंतु संरक्षक कठडे, घाटातील अतिक्रमणे, अवैध बांधकामे, वाहनांचे पार्किंग अद्यापही बिनबोभाट सुरू आहे. घाट उतरल्यानंतर शिंदेवाडी फाट्याजवळील उड्डाण पुलाखालील वाहतूक रस्त्यावर (अंडरपास) माती टाकूनही दुचाकीस्वार धोकादायक पद्धतीने विरुद्ध दिशेने कात्रज घाटात जात असल्याचे दिसून आले. 

भीषण अपघाताची शक्‍यता 
शिंदेवाडी येथील सेवारस्त्यावरून विरुद्ध दिशेने खासगी जडवाहतुकीचे ट्रक, टॅंकर, पीएमपी बस येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे भविष्यात भीषण अपघात होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी महामार्ग वाहतूक पोलिसांना सक्तीने विरुद्ध दिशेने वाहतूक करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित आहे. शिंदेवाडीवरून नवीन कात्रज बोगद्यात जाण्यासाठीच्या उड्डाण पुलाशेजारील सेवारस्ता बंद केलेला असताना बॅरिकेड बाजूला करून वाहतूक करत असल्याचे दिसून आले. 

  • रस्ता डांबरीकरण सुरू; संरक्षक कठडे, पिचिंगचे काम अद्याप नाही 
  • वाहतूक नियंत्रक पोलिसांना एकेरी वाहतुकीची कल्पनाच नाही 
  • नवीन कात्रज बोगद्यात जाण्यासाठी बॅरिकेड बाजूला करून वाहतूक 
  • विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाड्यांवर दंडात्मक वसुली करणे गरजेचे
Web Title: marathi news Pune News Pune To Satara Katraj Ghat