जंक्शनमध्ये बारामती-इंदापूर राज्यमार्गावर अडीच तास रास्तारोको 

walchandnagar
walchandnagar

वालचंदनगर : कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये कडकडीत बंद पाळून जंक्शन येथे बारामती-इंदापूर राज्य महामार्गावर सुमारे अडीच तास रास्तारोको आंदोलन करुन घटना घडविण्यास कारणीभूत असलेल्या मिलिंद एकबोट व संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
 
इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील वालचंदनगर, निमसाखर, कळंब, जंक्शन, लासुर्णे परीसरातील नागरिकांनी कडकडीत बंद पाळला. लासुर्णे येथील भीमसैनिकांनी लासुर्णे ते जंक्शनपर्यंत निषेध मोर्चा काढला होता. जंक्शन चौकामध्ये सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास  पश्‍चिम भागातील सर्व गावातील नागरिक जमा झाले होते. जंक्शन  सुमारे अडीच तास बारामती-इंदापूर राज्यमहामार्ग रोखून धरला होता. या रास्तारोको आंदोलनामध्ये महिलांनीही उत्सफुर्तपणे सहभाग घेवून कोरेगाव-भीमाच्या घटनेचा निषेध नोंदवला. आंदोलनामध्ये विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यसरकारचा कडक शब्दामध्ये समाचार घेवून कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या घटनेचा निषेध करुन या घटनेस जबाबदार असलेल्या मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे गुरुजीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आंदोलनामध्ये एम. बी. मिसाळ, विनायक लोंढे, नेताजी लोंढे, सागर मिसाळ, श्रीपती चव्हाण, आतिष मिसाळ, सूरज वनसाळे, अजित ठोकळे, हर्षवर्धन गायकवाड, सुमित साबळे, संतोष लोंढे, सोमनाथ लोंढे, महेश लोंढे, अॅड. संजय चंदनशिवे, तुषार भोसले, मंगेश लोंढे, उषा मिसाळ, शोभा लोंढे, बायडाबाई चव्हाण, पोर्णिमा लोंढे यांनी भाषणे करुन कोरेगाव भीमा घटनेमध्ये अन्याय झाल्याचे सांगून दोषींना शिक्षा करण्याची मागणी केली. आंदोलनामध्ये जंक्शन सरपंच राजकुमार भोसले, नवनाथ धांडोरे, डॉ.संजीव लोंढे, दिलीप लोहकरे, बबलू सोनवणे, नागसेन मिसाळ, गणेश धांडोरे, बापू जाधव यांच्यासह अनेक भीमसैनिक उपस्थित होते. रास्तारोको आंदोलनानंतर उपस्थित नागरिकांनी व शाळेतील मुलींच्या हस्ते मंडलधिकारी गिरीष संदीकर व ग्रामसेवक सचिन करगळ यांना निवेदन देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com