लोकल उशिरा आल्याने तळेगावात प्रवाशांचा रेलरोको

गणेश बोरुडे
बुधवार, 31 जानेवारी 2018

तळेगाव स्टेशन : एक्सप्रेस गाड्यांना मार्ग मोकळा करुन देण्यासाठी थांबवून ठेवल्यामुळे, तब्बल अर्धा तास उशिराने तळेगाव स्टेशनला पोहोचलेल्या लोणावळा पुणे एल-६ डाऊन या लोकलच्या प्रतीक्षेत थांबलेल्या प्रवाशांचा संताप अनावर झाल्याने, प्रवाशांनी जवळपास अर्धा तास रेलरोको करत तळेगाव रेल्वे स्टेशन मास्तरांना घेराव घातला.

तळेगाव स्टेशन : एक्सप्रेस गाड्यांना मार्ग मोकळा करुन देण्यासाठी थांबवून ठेवल्यामुळे, तब्बल अर्धा तास उशिराने तळेगाव स्टेशनला पोहोचलेल्या लोणावळा पुणे एल-६ डाऊन या लोकलच्या प्रतीक्षेत थांबलेल्या प्रवाशांचा संताप अनावर झाल्याने, प्रवाशांनी जवळपास अर्धा तास रेलरोको करत तळेगाव रेल्वे स्टेशन मास्तरांना घेराव घातला.

पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर नेहमीच जलदगती गाड्यांना प्राधान्य दिले जाते. त्यासाठी लोकल अनेक वेळा स्थानकावर अथवा मधेच काही कला थांबवून ठेवल्या जातात. त्यामुळे घाईत असलेल्या चाकरमानी, नोकरदार, व्यवसायिक आणि विद्यार्थ्यांसह इतर प्रवाशांचा खोळंबा होतो. कामावर पोहोचायला उशीर झाल्यास कधीकधी गैरहजेरी लागते. गेल्या आठवडाभरापासून लोकल गाड्यांचे वेळापत्रक आणखीनच कोलमडले आहे. 

आज बुधवारी (ता. 31) सकाळी 8:48 ची लोणावळा-पुणे लोकल पंधरा मिनिटाने उशिरा येणार असल्याची उद्घोषणा तळेगाव रेल्वे स्थानकावर करण्यात आली. त्यानंतर ही लोकल कशीबशी सव्वानऊला तळेगाव रेल्वे स्टेशनला पोहोचली. त्यानंतरही दोन एक्सप्रेस गाड्यांना मार्ग मोकळा करुन देण्यासाठी ही लोकल जवळपास अर्धा तास तिथेच थांबवून ठेवण्यात आल्याने संताप अनावर झालेल्या प्रवाशांनी रेल्वेची चेन खेचून धरत रेल्वे रुळांवर ठिय्या मांडला.

रेल्वे प्रवाशांच्या निषेधाच्या घोषणा देत 70 ते 80 प्रवासी थेट अधिकाऱ्यांच्या दालनात घुसले. दालनात घुसून जोरजोरात टेबलावर ठोसे मारत स्टेशन मास्तरांना घेराव घातला. अचानक झाल्या प्रकाराने स्टेशन मास्तर आणि इतर रेल्वे कर्मचाऱ्यांचा पुरता गोंधळ उडाला. कर्तव्यावर स्टेशन मास्तर सुरेश मीना यांनी रेल्वे प्रबंधकांशी चर्चा करुन, येथून पुढे लोकल वेळापत्रक पाळण्याचे आश्वासन दिल्यानंतर संतप्त प्रवासी काहीसे नरमले. प्रवाशांची समजूत काढल्यानंतर दहाच्या सुमारास लोकल पुण्याकडे रवाना झाली. संतप्त प्रवाशांचा रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न रेल्वे पोलीस संदीप तोडमल, अरुण गायकवाड आणि सहकाऱ्यांनी प्रसंगावधान राखून हणून पाडला.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या :
भाजपा म्हणते, राहुल गांधींचे जॅकेट 70 हजारांचे
आई-बाबा सांगा ना, आमची काय चूक...​
मृत तरुणी परत आल्याच्या अफवेने गोंधळ​
"हे राम' म्हटल्याबद्दलच्या विधानाचा विपर्यास​
सरकारी कर्मचाऱ्यांना रविवारी रजा नको; न्यायालयाची सूचना​
विकासवृद्धीसाठी झेपावे निर्यातीकडे!​

श्रीमंत देशांत भारत सहावा; अमेरिका प्रथम
तनिष्कने केली 1045 धावांची नाबाद विश्‍वविक्रमी खेळी​
दोषींवर कडक कारवाई करू; आदित्यनाथ यांनी मौन सोडले​

Web Title: Marathi news pune news railroko at talegao