संवादाची बदलती माध्यमे आत्मसात करा - रमेश गोपालकृष्ण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 मार्च 2018

पुणे - ‘‘संवादाची भाषा, माध्यम आणि साधने बदलली आहेत. मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य घटक बनत चालला आहे. विविध समाजमाध्यमांद्वारे शब्द, छायाचित्रे आणि दृक्‌श्राव्य स्वरूपात संवाद साधला जात आहे. संवादाच्या बदलत्या समाजमाध्यमांना आत्मसात केल्याशिवाय कोणत्याही व्यवसायात यश संपादन करणे शक्‍य नाही,’’ असे मत ‘फेसबुक’चे एशिया-पॅसिफिक मुख्य रमेश गोपालकृष्ण यांनी शुक्रवारी व्यक्त केले. 

‘पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडिया’च्या) वतीने आयोजित १२ व्या दोनदिवसीय ‘जागतिक संवाद परिषदे’च्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी पीआरसीआयचे अध्यक्ष आर. टी. कुमार, एम. बी. जयराम, बी. एन. कुमार आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी ‘चाणक्‍य’ विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच ‘चाणक्‍य’ व ‘हॉल ऑफ फेम’ असे पुरस्कारही देण्यात आले. 

गोपालकृष्ण म्हणाले, ‘‘फेसबुक आणि व्हॉट्‌स ॲपसारख्या समाजमाध्यमांद्वारे प्रत्येक व्यक्ती अभिव्यक्त होत आहे. मोबाईलमुळे प्रत्येकाला माहितीचे अनेक स्रोत उपलब्ध झाले आहेत. एका जागतिक सर्वेक्षणानुसार प्रत्येक व्यक्ती दिवसभरातून सरासरी २ हजार ६०० वेळा मोबाईल तपासतो. प्रत्येक व्यक्तीचा सरासरी ‘लक्ष देण्याची वेळ’ हा फक्त दोन मिनिट ३ सेकंद इतका झाला आहे. जगभरात २४ तासांमध्ये समाजमाध्यमांद्वारे १० कोटी छायाचित्रे पाठविली जातात. तसेच ई मेल तपासण्यासाठी किमान ३ तास इतका सरासरी वेळ दिला जातो.’’

यशाची सहा तत्त्वे
यश संपादन करायचे असल्यास ‘खुल्या वातावरणात काम करणे, मोबाईलचा पुरेपूर वापर करणे, सर्वांसोबत सुसंवादी राहणे, सर्वांना एकत्र घेऊन मुख्य प्रवाहात सामील होणे, सतत इंटरनेटने जोडलेले असणे आणि व्यक्तीनिहाय उल्लेखाने प्रोत्साहित करणे या सहा तत्त्वांच्या आधारे भविष्यात कुठल्याही सेवा आणि उत्पादन क्षेत्रांत काम करावे लागेल, असे भाकीतही गोपालकृष्ण यांनी या वेळी वर्तविले. 

Web Title: marathi news pune news ramesh gopalkrishna