अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी पालिसांच्या ताब्यात

महेंद्र शिंदे
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

खेड-शिवापूर (पुणे) : शिवापूर (ता.हवेली) येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बळीराम देवीदास जावळे (वय 42, सध्या रा. शिवापूर, पुणे. मूळ रा. बीड) याच्यावर राजगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक लोकांकडून माहिती मिळताच पोलिसांनी तत्परता दाखविल्याने आरोपीही पोलिसांच्या ताब्यात आला आहे.

याबाबत राजगड पोलिसांनी माहिती दिली. पिडीत मुलगी ही तीच्या आई-वडीलांसमवेत शिवापूर येथील वेताळवस्तीत राहते. तर आरोपी हा त्यांच्या शेजारीच राहतो. बुधवारी (ता.7) सायंकाळी चार ते सहा वाजण्याच्या दरम्यान आरोपीने पिडीत मुलीला खाउसाठी पैसे देऊन त्याच्या खोलीत बोलावून घेतले. यावेळी आरोपीने पिडीत मुलीवर लैंगिक अत्याचार केले. 

रात्री या मुलीने आईला पोटात दुखत असल्याचे सांगितले. तर दुसऱ्या दिवशी शौच करताना त्या मुलीला खुप त्रास होऊ लागला. त्यामुळे मुलीच्या आईने तीला विश्वासत घेऊन विचारले असता त्या मुलीने झालेला प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर गुरुवारी (ता.8) सायंकाळी या मुलीचे पालक आरोपीला मारहाण करुन त्याला याबाबत जाब विचारत होते. 

हा प्रकार गावातील काही नागरीकांकडून पोलिस हवलदार संतोष तोडकर यांना समजला. त्याबरोबर तोड़कर ताबडतोब त्याठिकाणी गेले. यावेळी पळून जाण्याच्या तयारीत असलेला आरोपी जावळे याला त्यांनी शिताफीने पकडले. तोड़कर यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळेच आरोपी पोलिसांच्या हाती लागला.

त्यानंतर पीडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार राजगड पोलिसांनी जावळे याच्यावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. 
आरोपीला शुक्रवारी (आज) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. राजगडचे पोलिस निरीक्षक सुनील गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार समीर कदम पुढील तपास करत आहेत.

Web Title: Marathi news Pune news rape victim suspect arrested